भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी कसोटी मालिका ९ फेब्रुवारी २०२३ पासून भारतात होणार आहे. ही मालिका ४ सामन्यांची असेल. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार असून त्यासाठी दोन्ही संघांनी तयारी सुरू केली आहे. ही मालिका जिंकणे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने विराट कोहलीबद्धल एक महत्वाचे भाकीत केले आहे.

या मालिकेत भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीवर असेल. कारण त्याची बॅट ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोरदार तळपते. म्हणून विराट कोहलीचा कसोटीतील शतकाचा ३ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात येईल, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. अशात माजी क्रिकेटर आकाश चोप्राने एक भविष्यवाणी केली आहे की, कोहली या मालिकेत दोन शतकं झळकावेल.

विराट कोहलीचा कसोटीतील शतकाचा ३ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात येईल असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. अशात माजी क्रिकेटर आकाश चोप्राने एक भविष्यवाणी केली आहे की, कोहली या मालिकेत दोन शतके झळकावेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहली वेगळेच रुप धारण करतो –

त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “ही बॉर्डर गावसकर ट्रॉफी आहे. जर आपल्याल त्यात चांगली कामगिरी करायची असेल तर विराट कोहलीला धावा करणे आवश्यक आहे. जेव्हा तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतो तेव्हा तो वेगळे रुप धारण करतो. तो खूप सक्रिय होतो. त्याची सर्वोत्तम कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली आहे. अशा परिस्थितीत त्याच्याकडून पुन्हा एकदा चांगली कामगिरीची अपेक्षा आहे.”

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “ही चार कसोटी सामन्यांची मालिका आहे. त्यामुळे मला त्याच्याकडून दोन शतकांची अपेक्षा आहे. तो विराट आहे, तो नक्कीच धावा करेल अशी आशा आहे.”

हेही वाचा – IND vs AUS Test: बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सर्वात मोठे तीन वाद; ज्यामुळे भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झाला होता बराच गदारोळ

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला गेल्या ३ वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. विराट सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. त्याचा विक्रम पाहता या मालिकेतच तो आपल्या शतकाचा दुष्काळ संपवेल असे दिसते.

हेही वाचा – T20 World Cup 2023: ‘आम्हाला माहित आहे काय महत्वाचे आहे’; भारत-पाक सामन्यापूर्वी हरमनप्रीतची गर्जना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३६ डावांमध्ये ४८.०५ च्या सरासरीने एकूण १६८२ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात ७ शतके आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या १६९ आहे.