बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२३च्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने मजबूत पकड ठेवली आहे. या सामन्यापूर्वी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत बरीच चर्चा झाली होती. ऑस्ट्रेलियन मीडियानेही बरीच विधाने केली होती. दरम्यान, सामना सुरू झाला तेव्हा कांगारू संघ संपूर्ण तीन सत्रे खेळू शकला नाही आणि ६३.५ षटकात केवळ १७७ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने खेळपट्टीवर निर्माण झालेल्या प्रश्नांना चोख प्रत्युत्तर देत दुसऱ्या दिवसअखेर ७ गडी गमावत ३२१ धावा केल्या. विशेष म्हणजे रोहित शर्माने शतक झळकावले आणि ९व्या क्रमांकाचा फलंदाज अक्षर पटेलनेही अष्टपैलू रवींद्र जडेजासोबत अर्धशतक केले.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर नक्कीच ऑस्ट्रेलियन मीडियाला नागपूरच्या खेळपट्टीबाबत उत्तर मिळाले असेल. सामन्यापूर्वी डावखुऱ्या फलंदाजांविरुद्धच्या रणनीतीनुसार खेळपट्ट्या बनवण्याबाबत सातत्याने चर्चा होत होती. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारताकडे फक्त दोन डावखुरे आहेत, जडेजा आणि अक्षर, या दोघांनी पन्नास धावा करत अर्धशतकं ठोकली आहेत. दुसऱ्या दिवशी यष्टिचीत झाल्यानंतर अक्षर पटेलच्या एका वक्तव्याने ऑस्ट्रेलियन संघाची आणि त्याच्या मीडियाची चिंता वाढली असती. खरे तर दिवसाचा खेळ संपल्यानंतर संजय मांजरेकर यांच्या एका प्रश्नाला अक्षरने असे उत्तर देऊन कांगारूंची हवाच काढून टाकली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अक्षरने खेळपट्टीबाबत ऑस्ट्रेलियाकडून केलेल्या वक्तव्यांना चोख प्रत्युत्तर देत सर्वांची बोलती बंद केली.

‘अभी बैटिंग विकेट, जब हम बॉलिंग करेंगे तो’- अक्षर पटेल

दिवसाचा खेळ संपल्यानंतर संजय मांजरेकर यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान अक्षर पटेलला खेळपट्टीबाबत विचारले असता आधी तो त्या प्रश्नावर हसला आणि म्हणाला की, “उद्या आम्ही फलंदाजी करू तोपर्यंत ती फलंदाजीची खेळपट्टी चांगली असेल आणि फलंदाजीला मदत करेल. मला आशा आहे की जेव्हा आमच्या गोलंदाजीचा विचार केला जातो तेव्हा खेळपट्टी आम्हाला मदत करेल.” स्पष्टपणे दिलेले अक्षरचे हे उत्तर मजेदार होते आणि ऑस्ट्रेलियन मीडियाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना सडेतोड होते, जे त्याने हसतमुखाने दिले.

हेही वाचा: IND vs AUS: अखेर नागपूरच्या खेळपट्टीमागील रहस्य उलगडले! मार्मिक टिप्पणी करत सुनील गावसकरांनी टोचले कांगारूंचे कान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या दिवशीची स्थिती कशी होती?

दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने ६ विकेट्स गमावल्या. अश्विन आणि रोहितने दिवसाची सुरुवात चांगली केली. यानंतर पाठोपाठ काही विकेट पडत राहिल्या. पुजारा, कोहली, सूर्या आणि भरत यांनी निराशा केली. त्यानंतर गोलंदाजीत पाच विकेट घेणारा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजानेही बॅटने फटकेबाजी केली. त्याने शानदार अर्धशतक झळकावले. शतक झळकावल्यानंतर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जडेजा आणि अक्षर या जोडीने धावफलक हाताळला. दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने ७ गडी गमावून ३२१ धावा केल्या असून एकूण आघाडी १४४ धावांची झाली आहे. जडेजा ६६ आणि अक्षर ५२ धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियाकडून नवोदित टॉड मर्फीने ५ बळी घेतले. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्याच दिवशी १७७ धावांत गारद झाला होता.