KS Bharat failed once again: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४६९ धावा केला. प्रत्युत्तरात भारतीय संघांची सुरुवात खराब झाली. त्यामुळे संघाला दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद १५१ धावा करता आल्या. तिसऱ्या दिवशीही भारतीय संघाला श्रीकर भरतच्या रुपाने सहावा धक्का बसला. केएस भरत ५ धावा करून स्कॉट बोलंडच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो पुन्हा एकदा अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला.

ऋषभ पंतच्या जागी भरत मिळाली होती संधी-

केएस भरतने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने चाहत्यांची निराशा केली आहे. ऋषभ पंतच्या जागी केएस भरतचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला होता. त्याचा अनुभव पाहून इशान किशनऐवजी त्याला संधी देण्यात आली होती, मात्र या मोठ्या सामन्यातील कामगिरीने भरतने पुन्हा एकदा निराश केले आहे. केएस भरतची विकेट पडताच चाहत्यांना सोशल मीडियावर ऋषभ आणि इशानची आठवण येऊ लागली. त्याचबरोबर यूजर्सनी भरतवर खूप टीका करायला सुरुवात केली.

भरतची कसोटीतील सरासरी २० च्या जवळ –

युजर्सनी केएस भारतला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. इशान संघात असूनही त्याला संधी का देण्यात आली नाही, असेही विचारत आहेत. डब्ल्यूटीसी फायनलच्या पहिल्या डावासह, श्रीकर भरतने ५ कसोटीच्या ९ डावात फक्त १०६ धावा करू शकला आहे. कसोटीत त्याची सरासरी २० च्या जवळपास आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी पाहिला मिळालेली नाही.

हेही वाचा – IND vs AUS WTC Final: “कोण म्हणतं ऑफ-स्पिन गोलंदाज…” सौरव गांगुलीने रोहित-द्रविडच्या संघ निवडीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

भरतपेक्षा इशान चांगला पर्याय होता –

ऋषभ पंतच्या क्रिकेटमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियामध्ये फक्त केएस भरतलाच जास्त संधी मिळाली आहे. यादरम्यान इशान किशनची संघात निवड झाली असली तरी त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इशानची फलंदाजीची सरासरी आणि स्ट्राईक दोन्ही केएस भरतपेक्षा सरस आहेत. इशानने मर्यादीत चेंडूच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने वनडेत द्विशतक झळकावले आहे.

तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्राचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात २६० धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणे ८९ आणि शार्दुल ३६ धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये सातव्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी झाली आहे. यासोबतच भारतीय संघाकडून फॉलोऑनचा धोकाही जवळपास टळला आहे. फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला नऊ धावांची गरज आहे.

हेही वाचा – IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनलमध्ये अजिंक्य रहाणे रचला इतिहास, भारतासाठी ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच भारतीय

मात्र, टीम इंडिया अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा २०९ धावांनी मागे आहे. या सत्रात श्रीकर भरत खूप लवकर बाद झाला, मात्र त्यानंतर रहाणे आणि शार्दुलने टीम इंडियाचे पुनरागमन केले. मात्र, ऑस्ट्रेलियन संघानेही दोघांना अनेक जीवदान दिले. कांगारूंचा कर्णधार कमिन्सने दोघांनाही एकदा बाद केले, पण दोन्ही प्रसंगी तो लेग बिफोर ऑफ लाइन होता आणि तो नो बॉल होता.

Story img Loader