Sourav Ganguly questions Rohit Sharma’s decision: डब्ल्यूटीसी स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४६९ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद १५१ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. दरम्यान माजी खेळाडू सौरव गांगुलीने रोहित शर्मा आणि राहुल द्रविडच्या संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दुसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपले कौशल्य दाखवले. दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही रविचंद्रन अश्विनला न खेळवण्याच्या निर्णयावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव ४६९ धावांवरच आटोपला होता. यानंतर कांगारू संघाचा ऑफस्पिनर नॅथन लायननेही आपल्या फिरकीची जादू दाखवत महत्त्वाच्या वेळी रवींद्र जडेजाची विकेट घेतली. त्याचबरोबर आपल्या संघाला सामन्यावर पकड मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

हेही वाचा – IND vs AUS WTC Final 2023: विराट कोहलीबद्दलच्या प्रश्नावर सौरव गांगुलीने दिले उत्तर, म्हणाला, “तो असा खेळाडू आहे, ज्याला…”

दरम्यान सामन्यात समालोचकाच्या भूमिकेत असलेला सौरव गांगुली लायनने विकेट घेतल्यानंतर म्हणाला, “कोण म्हणतं ऑफ-स्पिन गोलंदाज हिरव्या खेळपट्टीवर खेळू शकत नाही? डाव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध नॅथन लायनचा हा चेंडू बघा. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी त्याला भारताच्या सर्वोत्तम फलंदाजाची विकेट मिळाली आहे.”

नॅथन लायनची स्तुती करताना गांगुली पुढे म्हणाला, की लक्षात ठेवा की तो केवळ आशियामध्येच नाही, तर ऑस्ट्रेलियातही विकेट घेतो. जिथे वेगवान गोलंदाजीसाठी योग्य खेळपट्ट्या आहेत. माझ्या मते, तो आतापर्यंतच्या महान गोलंदाजांपैकी एक आहे.

हेही वाचा – WTC Final IND vs AUS: द्रविड-लक्ष्मणचे उदाहरण देताना सुनील गावसकरांनी दिला महत्त्वाचा सल्ला; म्हणाले, “टीम इंडियाने …”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताला अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकाने तारले –

सामन्याबद्दल बोलायचे तर, भारतीय संघाने पहिल्या डावात अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकाच्या जोरावर ४८.३ षटकांनंतर ६ बाद २०४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर अजिंक्य रहाणे ९६ चेंडूत ५७ धावांवर नाबाद आहे. तसेच शार्दुल ठाकुर त्याला साथ देताना १६ धावांवर खेळत आहे. भारतीय संघ अजूनही २६९ धावांनी पिछाडीवर आहे.