IND vs BAN 1st Test Rohit Sharma raises Rishabh Pant video viral : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने ६३३ दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. चेन्नई येथे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने स्फोटक फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. एकेकाळी भारताची धावसंख्या ३ बाद ३४ धावा अशी होती. यानंतर ऋषभ पंतने यशस्वी जैस्वालसह आपल्या संघाची पडझड थांबवली. त्याने ५२ चेंडूत ३९ धावांची जलद खेळी करत बांगलादेशी गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर कर्णधार रोहित शर्मानेही त्याच्यासाठी टाळ्या वाजवून कौतुक केले.

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमूदने पहिल्या तासातच भारताच्या टॉप-३ फलंदाजांना ३४ धावांपर्यंत रोखले. अशा स्थितीत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंतने सलामीवीर यशस्वी जैस्वाल सोबत जबाबदारी स्वीकारली आणि टीम इंडियाला आणखी धक्का बसू दिला नाही. बांगलादेशी वेगवान गोलंदाज आक्रमण करण्याआधीच ऋषभ पंतने स्फोटक फलंदाजीला सुरुवात केली. ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वालने चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली.

India vs Bangladesh Rohit Sharma Masterstroke in 1st Test Sending Rishabh Pant Ahead of KL Rahul
IND vs BAN: बांगलादेश कसोटीत रोहित शर्माचा मास्ट्ररस्ट्रोक, तीन विकेट्स गमावल्यानंतरही भारताने कसा सावरला डाव?
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
IND vs BAN Yashasvi Jaiswal broke George Headley's record
IND vs BAN : यशस्वी जैस्वालचा मोठा पराक्रम! जॉर्ज हेडलीचा ८९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत लिहिला इतिहास
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
IND vs BAN 1st Test Ravichandran Ashwin 6th century
IND vs BAN : रविचंद्रन अश्विनचे ऐतिहासिक शतक! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
IND vs BAN Ravichandran Ashwin scored a century against Bangladesh
IND vs BAN : अश्विनच्या झुंजार शतकी खेळीच्या जोरावर भारताने उभारला धावांचा डोंगर, बांगलादेशी गोलंदाजांची उडवली झोप

रोहित शर्माला टाळ्या वाजवायला भाग पाडले –

ऋषभ पंतने ७५.०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ६ चौकार मारले. ऋषभ पंतची तुफानी फलंदाजी पाहून कर्णधार रोहित शर्मालाही टाळ्या वाजवायला भाग पाडले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऋषभ पंतने आक्रमकता कायम ठेवली. ऋषभ पंत केवळ चौकार मारण्याचा प्रयत्न करत नव्हता तर संधी मिळताच एकेरी धाव घेण्याचाही प्रयत्न करत होता. भारतीय डावाच्या २६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतला लिटन दासने वेगवान गोलंदाज हसन महमूदकरवी झेलबाद केले.

हेही वाचा – IND vs BAN : ‘शुबमन भारताचा बाबर आझम…’, बांगलादेशविरुद्ध शून्यावर बाद झाल्याने सोशल मीडियावर ट्रोल

ऋषभ पंत ५२ चेंडूत ३९ धावांची झटपट खेळी करून बाद झाला. ऋषभ पंतला मोठी खेळी करता आली नसली तरी त्याने ३४/३ अशा कठीण परिस्थितीतून टीम इंडियाची सुटका केली. भारताने वृत्ती लिहिपर्यंत ५० षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिल्या डावात ६ गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा राहुल (१४ धावा) आणि रविचंद्रन अश्विन(२४ धावा) क्रीजवर आहेत.