चट्टोग्राम येथे भारत आणि बांगलादेश संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात ४०४ धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेश संघाने आपल्या पहिल्या डावात फक्त १५० धावा केल्या. तसेच आता भारतीय संघाच्या डावाला सुरुवात झाली आहे. या डावात भारतीय संघाचा सलामी फलंदाज शुबमन गिल शतकी खेळी केली आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक आहे.

शुबमन गिलने १४९ चेंडूत १० चौकार आणि २ षटकार लगावत १०४ धावा केल्या. त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा ४२ धावांवर खेळत आहे. भारतीय संघाने ४९ षटकांत १बाद १७७ धावा केल्या आहेत. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शानदार नाबाद ५५ धावांची खेळी केली. परंतु भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल मात्र स्वस्तात परतला. त्याने २३ धावांचे योगदान दिले. त्याला खालिद अहमदने बाद केले.

भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात विजयाचा मजबूत पाया रचला आहे. ४०४ धावांच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत गुंडाळून भारताने २७४ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर फॉलो ऑन न देता भारतीय फलंदाज पुन्हा मैदानावर उतरले. शुभमन गिल व चेतेश्वर पुजारा या जोडीने बांगलादेशच्या नाकी नऊ आणले आहे.

हेही वाचा – IND vs BAN 1st Test: २२ महिन्यांनी कमबॅक करणाऱ्या कुलदीपने रचले विक्रमांचे मनोरे, पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिलाच भारतीय गोलंदाज –

चट्टोग्रामच्या मैदानावर पाच विकेट्स घेणारा कुलदीप यादव हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याने १६ षटके गोलंदाजी करताना ४० धावा दिल्या आणि पाच विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या या स्पेलमध्ये मुशफिकूर रहीम, शाकिब अल हसन, नुरुल हसन, तैजुल इस्लाम आणि इबादत हुसेन या तंबूत पाठवले. याचबरोबर तो भारतासाठी चट्टोग्रामच्या मैदानावर पाच विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.