भारत आणि बांगलादेश संघात तीन सामन्याची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर सुरु आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बांगलादेशने हिरो मेहदी हसन मिराजच्या नाबाद शतकाच्या जोरावर ७ बाद २७१ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी २७१ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाला पहिला धक्का मोहम्मद सिराजने दिला. त्याने दुसऱ्या षटकातच सलामीवीर अनामुल हकला पायचित केले. अनामुलने ९ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने ११ धावा केल्या. त्याच्यानंतर लिटन दास (७) आणि नजमुल हुसेन शांतो (२१) बाद झाले. यानंतर ही बांगलादेशची पडझड सुरुच होती. त्यामुळे बांगलादेशने १८.६ षटकांनंतर ६ बाद ६९ धावा केल्या होत्या.

महमुदुल्ला आणि मेहदी हसन मिराजची दमदार भागीदारी –

दरम्यान, महमुदुल्ला आणि मागील सामन्यातील हिरो मेहदी हसन मिराजने डाव सावरण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याचबरोबर या दोघांनी ते प्रत्यक्षात करुन देखील दाखवले. या दोघांनी सातव्या विकेटसाठी विक्रमी शतकी भागीदारी केली. दोघांनी सातव्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी केली. ज्यामुळे बांगलादेश संघ मजबूत स्थिती पोहोचला. यानंतर महमुदुल्ला ७७ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्याने आपल्या ९६ चेंडूच्या खेळीत ७ चौकार फटकावले. त्याला बाद करुन उमरान मलिकने त्यांची भागीदारी मोडीत काढली.

हेही वाचा – PAK vs ENG Test Series: ‘ओ भाई, आप चेअरमैन हैं’, पाकिस्तानच्या पराभवानंतर रमीझ राजावर भडकला शोएब अख्तर

पुन्हा डावाची सूत्र आपल्या हाती घेताना शानदार शतक झळकावले. त्याने ८३ चेंडूचा सामना करताना ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०० केल्या. त्यामुळे बांगलादेशचा संघ २५० धावांचा टप्पा पार करु शकला. ज्यामुळे बांगलादेश संघाने ७ बाद २७१ धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी २७१ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारताकडून गोलंदाजी करताना फिरकीपटू वाशिंग्टन सुंदरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. या विकेट घेताना त्याने फक्त ३७ धावा दिल्या. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उमरान मलिकने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. दोघांनी अनुक्रमे ४७ आणि ५८ धावा दिल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban 2nd odi mehidy hasan mirajs century helped bangladesh set india a target of 272 runs vbm
First published on: 07-12-2022 at 15:52 IST