Virat Kohli has become the joint slowest player to score a century in IPL : विराट कोहलीने शनिवारी आयपीएल २०२४ च्या १९ व्या सामन्यात शानदार शतक झळकावले. विराटने राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. या डावात त्याने ६७ चेंडूत शतक झळकावले. तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रीजवर राहिला आणि त्याने ७२ चेंडूत ११३ धावांची नाबाद खेळी खेळली. या इनिंगमध्ये विराटच्या बॅटमधून १२ चौकार आणि ४ षटकार आले. मात्र या डावात विराटच्या नावावर इतिहासासोबतच एका नकोशा विक्रमाचीही नोंद झाली.

विराटने रचला इतिहास –

प्रथम विराटने रचलेल्या इतिहासाबद्दल बोलूया. विराट कोहली याआधीच आयपीएलमध्ये सर्वाधिक ७ शतके करणारा खेळाडू होता. हे त्याचे ८ वे शतक होते. त्याच्याशिवाय ख्रिस गेलने ६ शतके आणि जोस बटलरने ५ शतके आयपीएलमध्ये झळकावली आहेत. विराटचे हे टी-२० मधील नववे शतक आहे. त्याने ॲरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल क्लिंगर यांना मागे टाकले ज्यांनी प्रत्येकी ८ शतके झळकावली. सर्वाधिक टी-२० शतके झळकावण्याच्या बाबतीत तो ख्रिस गेल (२२) आणि बाबर आझम (११) यांच्या मागे आहे.

Rajasthan Royals beat Royal Challengers Bangalore by 6 wickets
IPL 2024, RR vs RCB : बटलरचं शतक कोहलीच्या शतकावर भारी, राजस्थानने साकारला बंगळुरूवर विजय
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

विराटने नोंदवला नकोसा विक्रम –

विराट कोहलीची ही खेळी ऐतिहासिक असतानाच त्याच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला. कोहली आता आयपीएलमध्ये सर्वात संथ शतक झळकावणारा संयुक्त खेळाडू बनला आहे. २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध ६७ चेंडूत शतक झळकावताना हा विक्रम मनीष पांडेच्या नावावर होता. या इनिंगमध्ये विराट कोहलीने ६७ चेंडूत शतक झळकावले. या यादीत विराट आणि मनीषशिवाय सचिन तेंडुलकर, जोस बटलर आणि डेव्हिड वॉर्नर यांचीही नावे आहेत, ज्यांनी ६६-६६ चेंडूत शतके झळकावली आहेत.

हेही वाचा – IPL 2024, RR vs RCB : विराट कोहलीने रचला इतिहास! राजस्थान रॉयल्सविरुद्ध झळकावले पहिले शतक

आरसीबी संघाने रचला इतिहास –

आयपीएलच्या इतिहासात आरसीबी संघाकडून १८ शतके झळकावण्यात आली आहेत. यासह, आरसीी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा संघ बनला आहे. आरसीबीने टीम इंडियाचा विक्रम मोडला आहे. टीम इंडियाने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत १७ शतके ठोकली आहेत. राजस्थान रॉयल्सचे १४ शतकासह तिसऱ्या तर पंजाब किंग्जचा संघ १४ शतकासह चौथ्या स्थानावर आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे संघ:

आरसीबी – १८ शतके
भारतीय संघ- १७ शतके
राजस्थान रॉयल्स -१४ शतके
पंजाब किंग्स- १४ शतके
सॉमरसेट – १३ शतके