IND vs BAN 1s Test Rohit Sharma got trolled on social media : भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा बॅटने काही खास प्रभाव टाकू शकला नाही. त्याला दोन्ही डावातही मोठी खेळी साकारता आली नाही. पहिल्या डावातही हिटमॅनने निराशा केली होती, तर दुसऱ्या डावातही तो स्वस्तात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, रोहित आऊट झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल करण्यात आले. एका यूजरने तर रोहितला चुकीच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलीस, असं म्हंटल आहे.
रोहित शर्मा सोशल मीडियावर ट्रोल –
रोहित शर्माने टी-२० विश्वचषकानंतर टी-२० आंरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तेव्हापासून, तो भारतासाठी कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळताना दिसत आहे. मात्र, या निर्णयावरुन चाहते रोहितला ट्रोल करत आहेत. कारण बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १९ चेंडूंत ६ धावा करुन बाद झाला होता. पहिल्या डावातील खराब कामगिरीनंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाला रोहितकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तो दुसऱ्या डावातही धावा काढण्यात अपयशी ठरला. तो ७ चेंडूत ५ धावा काढून बाद झाला.
रोहित शर्माला पहिल्या डावात वेगवान गोलंदाज हसन महमूदने तर दुसऱ्या डावात तस्किन अहमदने झेलबाद केले. यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी रोहितवर टीका करण्यास सुरुवात केली. त्याला चांगलेच ट्रोल करण्यात आले. ज्यामध्ये काहीजण त्याला चुकीच्या फॉर्मेटमधून निवृत्त घेतल्याबाब बोलत आहे, तर काहीजण रोहित ऐवजी युवा खेळाडूंना संधी देण्याबाबत बोलत आहेत. मात्र, काही यूजर्स रोहित दोन्ही डावात लवकर बाद झाल्याबद्दल दु:खही व्यक्त करताना दिसले.
रोहित शर्माबद्दल सोशल मीडियावरील प्रतिक्रिया –
टीम इंडियाचा कर्णधार दोन्ही डावात खराब कामगिरी करून रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, रोहितनंतर यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीच्या रूपाने भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ३०८ धावांची आघाडी मिळवली होती. याशिवाय भारतीय संघाची धावसंख्या २३ षटकानंतर ३ बाद ८० धावा आहे. आता शुबमन गिल ६४ चेंडूत ३३ धावांवर आणि ऋषभ पंत १३ चेंडूत १२ धावांवर नाबाद आहे.