Ravindra Jadeja completes 200 Test wickets in India : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकोट कसोटीत चेंडूने इतिहास रचला आहे. खरे तर पहिल्या डावात फलंदाजी करत शतक झळकावणाऱ्या रवींद्र जडेजाने गोलंदाजी करताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला बाद करत पहिला बळी घेतला. यासह जडेजाने भारतीय भूमीवर २०० कसोटी बळी पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय ठरला आहे. जडेजापूर्वी कपिल देव, हरभजन सिंग, आर अश्विन आणि अनिल कुंबळे यांनी हा विक्रम केला आहे. त्याने ५०० प्रथम श्रेणी विकेट्स देखील पूर्ण केल्या आहेत.

अनिल कुंबळे या यादीत अव्वल –

रवींद्र जडेजाने भारतीय भूमीवर ४२ सामन्यांत २०० कसोटी बळी पूर्ण केले आहेत. जडेजापूर्वी कपिल देवने ६५ सामन्यांत २१९, हरभजन सिंगने ५५ सामन्यात २६५ बळी, अश्विनने ५८ सामन्यात ३४७ बळी आणि अनिल कुंबळेने ६३ सामन्यात ३५० कसोटी बळी घेतले होते. याशिवाय २०० देशांतर्गत विकेट्स पूर्ण करणारा जडेजा दुसरा डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी, श्रीलंकेचा दिग्गज रंगना हेरातच्या नावावर २७८ कसोटी बळी आहेत. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (२१७) हा मायदेशात कसोटीत २०० हून अधिक बळी घेणारा एकमेव डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.

Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
Rashid Khan breaks Mohammed Shami's record
GT vs SRH : राशिद खानने शमीचा विक्रम मोडत रचला इतिहास, गुजरातसाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
Sunil Chhetri
भारताचे विजयाचे लक्ष्य! अफगाणिस्तानविरुद्ध ‘फिफा’ विश्वचषक पात्रता सामना आज; छेत्रीकडून अपेक्षा

इंग्लंडचा डाव ३१९ धावांवर गडगडला –

राजकोट कसोटीत फलंदाजी करताना ११२ धावांची खेळी करणाऱ्या जडेजाने बेन स्टोक्सच्या रूपाने पहिली विकेट घेतली. जडेजाने जसप्रीत बुमराहच्या हाती स्टोक्सला झेलबाद केले. बेन स्टोक्स ८९ चेंडूत ४१ धावांची खेळी खेळून बाद झाला. स्टोक्स सहाव्यांदा जडेजाचा आंतरराष्ट्रीय बळी ठरला. उपाहारानंतर फलंदाजीला आलेला इंग्लंडचा संपूर्ण संघ ३१९ धावांत सर्वबाद झाला. पहिल्या डावाच्या आधारे भारताला १२६ धावांची आघाडी मिळाली आहे.

हेही वाचा – IND vs ENG : मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ची काढली हवा, भारताकडे पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी

जडेजाची आंतरराष्ट्रीय आकडेवारी –

डिसेंबर २०१२ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रवींद्र जडेजा हा तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचा नियमित खेळाडू आहे. १२ वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या जडेजाने ७० कसोटी सामन्यांच्या १३१ डावांमध्ये २८१ विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाने इंग्लंडविरुद्ध ५७ कसोटी बळी घेतले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर बारा वेळा ५ विकेट्स आहेत, तर त्याने दोन वेळा १० विकेट्सही घेतल्या आहेत. बेन स्टोक्सच्या विकेटसह जडेजाने केवळ २०० देशांतर्गत कसोटी विकेट्स पूर्ण केल्या नाहीत तर त्याने ५०० प्रथम श्रेणी विकेट्स देखील पूर्ण केल्या आहेत.