IND vs ENG 5th Test Day 3 Live Updates in Marathi: भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील अखेरचा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर खेळवला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना २२४ धावा केल्या. तर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २४७ धावांवर सर्वबाद झाला. तर इंग्लंडने प्रत्युत्तरात २४७ धावा केल्या. यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात कमालीची फटकेबाजी करत ३९६ धावा केल्या आहेत. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत १ बाद ५० धावा केल्या आहेत. यासह भारताकडे अजूनही ३२४ धावांची आघाडी आहे.
क्रॉली क्लीन बोल्ड
मोहम्मद सिराजने तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर क्रॉलीला क्लीन बोल्ड करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यासह इंग्लंडने पहिल्या दिवशी १ बाद ५० धावा केल्या.
भारतीय संघ ऑलआऊट
जोश टंगने वॉशिंग्टन सुंदरला बाद करताच भारतीय संघ सर्वबाद झाला. भारताने दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या आहेत. यासह इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे.
वॉशिंग्टन सुंदरचं अर्धशतक
वॉशिंग्टन सुंदरने ३९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह अर्धशतक केलं आहे. सुंदरने वादळी फटकेबाजीसह इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडला आहे. अर्धशतक करताच सुंदरने गर्जना करत सेलिब्रेशन केलं.
वॉशिंग्टनचे ३ गगनचुंबी षटकार
वॉशिंग्टन सुंदरने सिराज बाद झाल्यावर ३ षटकार लगावत भारताची आघाडी ३५०च्या पार नेली आहे. सुंदरने एटकिन्सनच्या षटकातील पाचव्या चेंडूवर आणि जोश टंगच्या षटकात २ षटकार लगावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
भारताने गमावली नववी विकेट
रवींद्र जडेजा झेलबाद झाल्यानंतर मोहम्मद सिराज फलंदाजीला आला. पण सिराज टंगच्या ८४व्या षटकातील पाचव्या चेंडूवर पायचीत झाला. टंगने टाकलेला चेंडू सिराजच्या पॅडवर आदळला आणि पंचांनी लगेच बाद झाल्याचं जाहिर केलं. पण चेंडू आधी बॅटला लागून मग सिराजच्या पायाला लागला. सिराजला रिव्ह्यू घ्यायचा होता, पण भारताकडे एकही रिव्ह्यू वाचला नव्हता. त्यामुळे सिराजला माघारी परतावं लागला. नंतर स्क्रिनवर चेंडू प्रथम बॅटला लागल्याचं अल्ट्राएजमध्ये दिसलं.
चौकार अन् जड्डूचं अर्धशतक
रवींद्र जडेजाने पाचव्या कसोटीतील दुसऱ्या डावात ७१ चेंडूत ५ चौकारांसह अर्धशतक झळकावलं. यासह भारताची आघाडी ३३० वर पोहोचली आहे.
टीब्रेक
भारतीय संघाने टीब्रेकपूर्वी ७१ षटकांत ६ बाद ३०४ धावा केल्या आहेत. यासह भारताने २८१ धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने ६ विकेट्स गमावल्यानंतर ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी संघाचा डाव पुढे नेला आहे.
यशस्वी जैस्वाल झेलबाद
ओव्हल कसोटीतील दुसऱ्या डावात जैस्वालच्या झेल तीन वेळा सोडल्यानंतर आता चौथ्यांदा जैस्वाल झेलबाद झाला. यशस्वी १६४ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांसह ११८ धावा करत बाद झाला. भारताची आघाडी आता २५० धावांच्या पलीकडे पोहोचली आहे.
यशस्वी जैस्वालचं शतक
यशस्वी जैस्वालने ओव्हलच्या मैदानावर शानदार शतक झळकावलं आहे. यशस्वीने १२९ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह शतक पूर्ण केलं. यासह भारताची आघाडी २०० धावांच्या पलीकडे पोहोचली आहे. जैस्वालच्या शतकानंतर ५५व्या षटकात करूण नायर एटकिन्सनच्या चेंडूवर झेलबाद झाला. यासह टीम इंडियाने ५ विकेट्स गमावले आहेत.
शुबमन गिल बाद
लंचब्रेकनंतर पहिल्याच चेंडूवर भारताला मोठा धक्का बसला आहे. एटकिन्सनचा भेदक चेंडू थेट जाऊन गिलच्या पॅडवर आदळला आणि पंचांनीही बाद दिलं. यानंतर गिलने रिव्ह्यू घेतला पण चेंडू अगदी मधोमध लागल्याने निर्णय इंग्लंडच्या बाजूने लागला.
आकाशदीप झेलबाद, भारताने लंचब्रेकपर्यंत किती धावा केल्या?
आकाशदीप जेमी ओव्हरटनच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. आकाशदीप ९४ चेंडूत १२ चौकारांसह ६९ धावा करत माघारी परतला. यासह भारताने लंचब्रेकपर्यंत ३ बाद १८९ धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाकडे १६६ धावांची आघाडी झाली आहे.
आकाशदीपचं पहिलं कसोटी अर्धशतक
आकाशदीपने कसोटी क्रिकेटमधील पहिलं शानदार अर्धशतक झळकावलं आहे. नाईट वॉचमन म्हणून आलेल्या आकाशदीपने तिसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालच्या साथीने संघाचा डाव सांभाळत संघाला १०० धावांच्या आघाडीचा टप्पा गाठून दिला. आकाशदीपने ७० चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. संपूर्ण भारतीय संघाने उभं राहत त्याचं टाळ्या वाजवून कौतुक केलं.
आकाशदीपच्या फटकेबाजीने इंग्लंडच्या नाकात केला दम
भारताचा नाईट वॉचमन म्हणून आलेल्या आकाशदीपने तिसऱ्या दिवसाच्या खेळात दमदार फटकेबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना हैराण केलं आहे. अचूक टाइमिंग आणि निर्भीड फटकेबाजीससह धावा करत आहे. त्याच्या या आक्रमक शैलीमुळे इंग्लंडच्या गोलंदाजांची लय बिघडली आहे. गोलंदाज असलेल्या आकाशदीपची फटकेबाजी पाहून इंग्लंडचा खेमा वैतागला आहे.
आकाशदीप-यशस्वीची अर्धशतकी भागीदारी
आकाशदीप आणि यशस्वी जैस्वाल यांनी तिसऱ्या दिवशी चांगली सुरूवात करत अर्धशतकी भागीदारी रचली आहे. दोघांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर भारताची आघाडीदेखील १००धावांच्या पलीकडे पोहोचली आहे.
भारताच्या १०० धावा पूर्ण
आकाशदीप आणि यशस्वी जैस्वाल यांनी तिसऱ्या दिवशी चांगली सुरूवात करत भारताचा डाव १०० च्या पार नेला आहे. सुरूवातीलाच आकाशदीपने चौकार लगावत दणक्यात सुरूवाच केली, तर जैस्वालनेही त्याला चांगली साथ दिली.
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात
भारत आणि इंग्लंड ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. यशस्वी जैस्वाल आणि नाईट वॉचमन म्हणून आलेल्या आकाशदीपची जोडी मैदानात उतरली आहे. भारताने दुसऱ्या दिवशी २ विकेट्स गमावल्यानंतर आकाशदीपला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं.
ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काय घडलं?
भारतीय संघ ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीला आला. पण सुरुवातीच्या अर्ध्या तासात भारताचे ४ फलंदाज झटपट माघारी परतले. त्यामुळे भारतीय संघाचा डाव २२४ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी आला. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या २४७ धावांवर आटोपला. या डावात इंग्लंडने २३ धावांची आघाडी घेतली. दरम्यान भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल ५१ धावांवर नाबाद आहे. तर केएल राहुल ७ आणि साई सुदर्शन ११ धावा करत माघारी परतला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात २ गडी बाद ७५ धावा करत ५२ धावांची आघाडी घेतली आहे.
भारताची पाचव्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज
इंग्लंडची पाचव्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग