England vs India 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान आजपासून (१ जुलै) कसोटी सामना सुरू झाला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना बर्मिंगहॅममधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवरती होत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेम्स अँडरसनने हा निर्णय योग्य ठरवला आहे. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने सातव्या षटकात शुबमन गिलला आणि त्यानंतर चेतेश्वर पुजाराला बाद केले. गिलला बाद केल्यानंतर जेम्सने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. त्याचे इंग्लंडमध्ये भारताविरुद्ध १०० कसोटी बळी पूर्ण झाले.

जेम्स अँडरसरनला इंग्लंडच्या कसोटी गोलंदाजीचा कणा समजले जाते. त्याने देखील वेळोवेळी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करून संघाची मदत केलेली आहे. सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यात त्याने पहिला बळी घेताच मायदेशात भारताविरुद्ध १०० बळींचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. अँडरसनच्या या विक्रमाच्या आसपास एकही गोलंदाज नाही.

shubhaman gil
ट्वेन्टी-२० विश्वचषक महत्त्वाचाच, पण तूर्तास ‘आयपीएल’वर लक्ष केंद्रित! गिलचे वक्तव्य
Ekta Day Ranveer Singh wins gold medal in steeplechase sport news
एकता डे , रणवीर सिंहला स्टीपलचेसमध्ये सुवर्ण
Candidates winner D Gukesh reaction that Viswanathan Anand sir guidance is valuable
विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत
Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Match Highlights in Marathi
SRH vs RCB : आरसीबीने सलग सहा पराभवानंतर नोंदवला दुसरा विजय, हैदराबादवर ३५ धावांनी केली मात

मालिका विजयाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या कसोटी सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने ४६ धावांत दोन बळी गमावले. शुबमन गिलच्या रुपात पहिला तर पुजाराच्या रुपात भारताला दुसरा झटका बसला.