गेल्या वर्षी अर्धवट राहिलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यापूर्वी चेतेश्वर पुजाराने ससेक्स कौंटीसाठी चांगली कामगिरी केली होती. पुजाराने पाच सामन्यांत ७००हून अधिक धावा केल्या होत्या. याच कारणामुळे त्याचा इंग्लंडविरुद्धच्या एजसबस्टन कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला. मात्र, या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पुजारा चांगली कामगिरी करू शकला नाही. जेम्स अँडरसनने त्याला अवघ्या १३ धावांवर माघारी धाडले. पुजारा बाद होताच त्याच्या नावावर एका विचित्र विक्रमाची नोंद झाली. कसोटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा १२व्या वेळी अँडरसनकडून बाद झाला.

जेम्स अँडरसनला इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज मानले जाते. वेळोवेळी त्याने आपले महत्त्व सिद्धही केले आहे. सध्या सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी त्याने अँडरसनने चांगली कामगिरी करत तीन भारतीय फलंदाजांना बाद केले. चेतेश्वर पुजारा हा या सामन्यातील त्याचा दुसरा बळी ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद केलेल्या फलंदाजांच्या यादीत पुजारा अव्वल स्थानावर गेला आहे. अँडरसनने पुजाराला १२ वेळा बाद केले. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पीटर सीडलला ११ वेळा बाद केले होते. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला १० वेळा, सचिन तेंडुलकर, मायकेल क्लार्क आणि अझहर अली यांना प्रत्येकी नऊ वेळा बाद केले आहे.