IND vs ENG Rohit Sharma and Gautam Gambhir Fight : भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा ४ विकेट्सनी पराभव केला. यासह टीम इंडिया मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १० गडी गमावून केवळ २४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियानेही ३९व्या षटकात काही विकेट्स गमावून सामना जिंकला. मात्र, या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पुन्हा निराशा केली. यानंतर रोहित शर्मा आणि गौतम गंभीरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रोहित शर्माने पुन्हा एकदा चाहत्यांची केली निराशा –

ऑस्ट्रेलियातील खराब दौऱ्यानंतर रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करत होता. नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमच्या मैदानावर रोहितला चांगली खेळी करता आली असती. मात्र, ७ चेंडूत केवळ २ धावा करून रोहित बाद झाला. त्याला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज साकिब महमूदने बाद केले. मात्र, शुबमन गिल, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर यांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवता आला. मात्र, या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.

रोहित-गंभीरचा व्हिडीओ व्हायरल –

पहिला एकदिवसीय सामना संपल्यानंतर, कॅमेरा काही सेकंदांसाठी भारतीय डगआउटकडे वळला, जिथे कर्णधार रोहित शर्मा प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी दीर्घ संभाषण करत होता. दोघांचे भाव पाहून अंदाज बांधला जात आहे की संघाच्या भवितव्याबाबत महत्त्वाची चर्चा होती. मात्र, काही चाहत्यांच्या मते दोघांमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरुन मतभेद सुरु होते. कारण अलीकडच्या काळात या दोन्ही दिग्गजांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, या व्हिडीओमध्ये दोघेही काय बोलत आहेत? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिडनी कसोटीपूर्वी वाद झाल्याची चर्चा-

बॉर्डर गावस्कर मालिकेदरम्यान रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. रोहित बॉर्डर गावस्कर या मालिकेत धावा करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला होता. त्यामुळे तो सिडनीत खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत खेळला नाही. दरम्यान, ड्रेसिंग रूममधूनही अनेक गोष्टी बाहेर आल्या होत्या.