India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना सर्वात मोठा सामना मानला जात होता. पण टीम इंडियाने या सामन्यात आतापर्यंत हार्दिक पांड्याशिवाय दमदार कामगिरी केली आहे. एकेकाळी न्यूझीलंडचा संघ ३०० च्या वर धावा करताना दिसत होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत किवी संघाला २७३ धावांवर रोखले. मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या. यानंतर रोहित शर्माने पुन्हा वेगवान सुरुवात करत ४० चेंडूत ४६ धावा केल्या आणि भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर विराट कोहलीने ९५ धावांची खेळी करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला.अशा प्रकारे भारतीय संघाने २० वर्षानंतर न्यूझीलंडवर ४ गडी राखून ऐतिहासिक विजय नोंदवला.दरम्यान, स्टँडमधील एका भारतीय चाहत्याचा फोटो व्हायरल झाला आहे, जो टीम इंडियाला खास पोस्टरसह चीअर करत होता.

या चाहत्याने जे पोस्टर हातात धरले होते, त्यावर ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या प्रसिद्ध चित्रपटातील डायलॉग लिहिलेला होता, मात्र हा संवाद क्रिकेटच्या भाषेत लिहिला होता. त्या डायलॉगचे शब्द होते, “बाप का, दादा का, माही भाई के रनआऊट का सबका बदला लेगा तेरा चिकू.” मात्र, त्यात चिकू असे लिहिले नाव विराट कोहलीचे आहे. अनेकदा एमएस धोनीही त्याला चिकू म्हणत असे. त्यामुळे प्रेक्षकांना २०१९ च्या विश्वचषक उपांत्य फेरीतील पराभवाची आठवण झाली. एमएस धोनीच्या रनआउटच्या आठवणीतील हा पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विराट कोहलीने बदला घेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

Deandra Dottin Javelin Gold Medalist Won Cricket Match in Super Over Caribbean Premiere League
VIDEO: सुवर्णपदक विजेत्या भालाफेकपटूने सुपर ओव्हरमध्ये संघाला जिंकून दिला सामना, भारताच्या जेमिमा रॉड्रीग्जने दिली साथ
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
pat cummins india marathi news
Pat Cummins: भारताविरुद्ध ग्रीन, मार्शने गोलंदाजीत अधिक जबाबदारी घेणे अपेक्षित – कमिन्स
Yashasvi Jaiswal Will be Massive Challenge for All of Us Bowlers Said Australia Nathon Layon
IND vs AUS: रोहित, विराट नाही तर ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लॉयनला भारताच्या ‘या’ तरूण खेळाडूचं टेन्शन, इंग्लंडच्या खेळाडूकडून घेतल्या टिप्स
Ben Stokes Hamstring Injury Walking With Help of Crutches Photo Viral
Ben Stokes: कुबड्यांचा आधार घेऊन चालतोय बेन स्टोक्स, इंग्लंडच्या कर्णधाराला नेमकं झालं तरी काय?
Indian men hockey team goalkeeper PR Sreejesh leads India to semi finals sport news
श्रीजेशमुळे भारत उपांत्य फेरीत; नियोजित वेळेतील बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनवर मात
Indian Hockey team celebration at Paris Olympics 2024
Indian Hockey Team : हॉकीच्या मैदानात सौरव गांगुली स्टाईल सेलिब्रेशन, ब्रिटनवरील विजयानंतर चाहत्यांना आठवला २२ वर्षे जुना विजय
2024 Carolina Marin breaks down in tears after injury at Paris Olympics 2024
Paris Olympics 2024 : सेमीफायनलमध्ये खेळताना कोर्टवर कोसळली कॅरोलिना मारिन, आघाडीवर असूनही झाली स्पर्धेतून बाहेर

पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल –

या चाहत्याचा हा मजेशीर पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेतील रनआउट चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. जेव्हा टीम इंडियाचे नशीब एमएस धोनीच्या रनआऊटने बदलले होते. भारताने २० वर्षांपासून आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडला हरवले नव्हते. त्यामुळे यावेळी टीम इंडिया किवी संघासोबतचा जुना बदला घेईल, अशी आशा सर्व चाहत्यांना होती आणि आता विराट कोहलीने चाहत्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

हेही वाचा – IND vs NZ: रोहित शर्माने मोडला एबी डिव्हिलियर्सचा विक्रम, विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा ठरला दुसरा फलंदाज

२० वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेत भारताला होती विजयाची प्रतीक्षेत –

टीम इंडियाला गेल्या २० वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेत सामना जिंकता आलेला नाही. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने न्यूझीलंडचा शेवटचा पराभव केला होता. त्यावेळी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने ७ विकेटने विजयी मिळवला होता. यानंतर न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक २००७ आणि टी-२० विश्वचषक २०१६ सह एकदिवसीय विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१ आणि टी-२० वर्ल्ड कप २०२१ च्या अंतिम फेरीत भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. मात्र आज भारतीय संघाने एक नवा इतिहास रचला आहे.