आशिया चषक २०२३ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना श्रीलंकेतील पल्लेकल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्वबाद २६६ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाने पाकिस्तानला विजयासाठी २६७ धावांचं आव्हान दिलं आहे. आजच्या या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. तर भारताकडून उपकर्णधार हार्दिक पांड्या आणि यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने उत्तम फलंदाजी केली.

या सामन्यात पाकिस्तानची गोलंदाजी, हार्दिक-इशानच्या फलंदाजीव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ते म्हणजे. या सामन्यात हार्दिक-इशान पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत होते, तेव्हा श्रीलंकेच्या पल्लेकल स्टेडियमध्ये आदिपुरूष या हिंदी चित्रपटातील ‘राम सिया राम’ हे गाणं ऐकवलं जात होतं. उपस्थित प्रेक्षकही हे गाणं गुणगुणत होते. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, या सामन्यात भारताने ६६ धावांत चार गडी गमावले होते. भारतीय संघाची अवस्था बिकट असताना इशान किशन आणि हार्दिक पांड्याने भारताचा डाव सावरला. हार्दिक पांड्या आणि इशान किशनच्या दमदार फलंदाजीमुळे भारतीय संघाने सामन्यात शानदार पुनरागमन केलं. इशानने पहिल्यांदाच पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत उत्कृष्ट अर्धशतक झळकावलं, दुसरीकडे हार्दिक पांड्याने पल्लेकेलेमध्ये आपली ताकद दाखवली.

हार्दिक पांड्या मैदानात आला तेव्हा अवघ्या ६६ धावांवर चार गडी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. परंतु, हार्दिक आपल्या डावाच्या सुरुवातीपासूनच कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली दिसला नाही. भारताच्या उपकर्णधाराने मुक्तपणे फटके मारले. इशानबरोबर हार्दिकने भारतीय डाव शानदारपणे हाताळला आणि शतकी भागीदारी केली. हार्दिकने शानदार फलंदाजी करत ६२ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो ९० चेंडूत ८७ धावा करून बाद झाला.

हे ही वाचा >> IND vs PAK: शाहीन आफ्रिदीचा गोल्डन इनस्विंग अन् रोहित शर्माच्या विकेटवर विराट कोहलीची रिअ‍ॅक्शन व्हायरल; पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या बाजूला इशान किशनने आक्रमक फलंदाजी केली. इशानने ८१ चेंडूत ८२ धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्याचं शतक हुकलं. इशानने आपल्या खेळीत ९ चौकार आणि दोन गगनचुंबी षटकार लगावले.