IND vs PAK ICC T20 World Cup 2024 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील १९ वा सामना आज (९ जून) न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात क्रिकेट जगातील सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. टी-२० विश्वचषकातील या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. ज्यामध्ये भारताने आयर्लंडवर विजय मिळवला असून पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पाकिस्तानला आजचा सामना जिंकणं गरजेचं आहे. तर भारताला या सामन्यात विजय मिळवून उपउपांत्य फेरीची दावेदारी पक्की करायची आहे.

दरम्यान, पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी नांगी टाकल्याचं पाहायला मिळालं. सलामीला आलेला विराट कोहली ४ धावांवर तर कर्णधार रोहित शर्मा १३ धावांवर बाद झाला. पाठोपाठ अक्षर पटेल (२०) आणि सूर्यकुमार यादव (७) स्वस्तात बाद झाले. ऋषभ पंतने काही वेळ एक बाजू लावून धरली होती. मात्र या सामन्यात त्याला तीन वेळा जीवदान मिळालं होतं. पाकिस्तानी खेळाडूंच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे पंतला ४२ धावांची खेळी साकारता आली. या सामन्यात पंतला आतापर्यंत तीन वेळा जीवदान मिळालं. तर अक्षरलाही एक जीवदान मिळालं होतं. मात्र अक्षर त्या जीवदानाचा फायदा उचलू शकला नाही.

सहाव्या षटकातील मोहम्मद आमिरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर दोन वेळा ऋषभला जीवदान मिळालं. उस्मान खानने ऋषभचा सोपा झेल सोडला. तर १० व्या षटकातील चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा त्याला जीवदान मिळालं. सातव्या षटकातील इफ्तिकार अहमदच्या दुसऱ्या चेंडूवर अक्षर पटेलला जीवदान मिळालं. अखेर १५ व्या षटकातील मोहम्मद आमिरच्या पहिल्या चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सोपा झेल पकडून ऋषभला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

हे ही वाचा >> IND vs PAK Live, T20 World Cup 2024 : भारताचा निम्मा संघ ९५ धावांवर गारद, शिवमपाठोपाठ ऋषभही ४२ धावांवर बाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या सामन्यातील पाकिस्तानचं ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहून समाजमाध्यमांवर पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांची फिरकी घेतली जात आहे. एक्स, फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर मिम्सचा पाऊस सुरू झाला आहे.