भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संघातील खेळाडू बॉक्सिंग डे कसोटी सामन्याची तयारी करताना दिसत आहेत. विराट कोहली आपल्या खेळासोबतच अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या जाहीराती करतो. अशाच एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो हेलियम वायूने ​​भरलेल्या फुग्यासोबत दिसत आहे.

विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो फुग्यातील हेलियम वायू श्वास घेतल्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. यादरम्यान त्यांचा आवाज पूर्णपणे बदलला आहे. यादरम्यान तो अनेक प्रश्नांची या बदललेल्या आवाजात उत्तरे देतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल, यात शंका नाही.

हेही वाचा – VIDEO : नापाक कृती..! कराचीत हिंदू मंदिराची तोडफोड; पाकिस्तानी क्रिकेटपटू भडकला; म्हणाला…

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दुसरा आणि तिसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग आणि केपटाऊनमध्ये अनुक्रमे ३ जानेवारी आणि ११ जानेवारीपासून खेळवला जाईल.

भारताचा कसोटी संघ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, प्रियांक पांचाल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, आर. शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज