India vs South Africa 3rd ODI: भारतीय फलंदाज संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पहिले शतक झळकावले, ज्यामुळे मेन इन ब्लूला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिका जिंकण्यात मदत झाली. बोलँड पार्कवर फलंदाजी करताना सॅमसनने ११४ चेंडूत १०८ धावा करत टीम इंडियाला २९६ धावांपर्यंत नेले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २१८ धावांत सर्वबाद झाला आणि भारताने हा सामना ७८ धावांनी जिंकून मालिका २-१ अशी खिशात घातली. संजूच्या या कामगिरीनंतर दिनेश कार्तिकने त्याचे खूप कौतुक केले आहे. दिनेश काय म्हणाला, ते जाणून घेऊया.

दिनेश कार्तिकने मालिका जिंकल्यानंतर संजू सॅमसनचे कौतुक केले आणि म्हटले की, फलंदाजाने दाखवून दिले की त्याचे इतके डाय-हार्ड चाहते का आहेत. क्रिकबझवर दिनेश म्हणाला, “सॅमसन अनेक वर्षांपासून संघाचा भाग आहे. संपूर्ण जग त्यांच्याबद्दल चांगले बोलते आणि त्याचे लाखो समर्थक आहेत. तो त्यांच्यावर प्रेम करतो आणि ते त्याचे कौतुक करतात. त्याचा इतका निष्ठावान चाहता वर्ग का आहे हे त्यांनी दाखवून दिले. संपूर्ण जग त्याचे आता चाहता वर्ग झाला आहे.”

हेही वाचा: IND W vs AUS W: रिचा घोषचा अफलातून थ्रो अन् बेथ मुनी धावबाद, तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया मजबूत स्थितीत; पाहा Video

दिनेश कार्तिक पुढे म्हणाला, “शेवटच्या सामन्यात त्याने क्रमांक तीन वर फलंदाजी केली, ती त्याची आवडती फलंदाजी करण्याची जागा आहे. त्याने कर्णधार के.एल. राहुलबरोबर चांगली भागीदारी केली. कर्णधार बाद झाल्यावर सॅमसनने भारताला आघाडीवर ठेवण्यासाठी तिलक वर्माला हाताशी घेत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. त्याच्या डाव सावरण्याच्या योजनेला सर्वानी १०० पैकी १०० गुण दिले आहेत.”

कार्तिक पुढे म्हणाला की, “उल्लेखनीय बाब अशी आहे आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिलक वर्माने ७७ चेंडूत ५२ धावा केल्या होत्या. सॅमसन आणि तिलक यांनी ११६ धावा जोडल्या आणि शेवटच्या ६-७ षटकात ६० धावा झाल्या. सॅमसनने त्याच्या डावात लवकर जोखीम घेतली नाही कारण त्याला माहित होते की तो सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात धावसंख्या वाढवू शकतो. अलीकडेच, सॅमसनची वन डे विश्वचषकासाठी संघात निवड झाली नव्हती, ज्याबद्दल तो म्हणाला की ही वेळ त्याच्यासाठी आव्हानात्मक होती.”

टी-२० आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ कसोटी सामने खेळण्यासाठी आला होता, त्यातील अर्ध्याहून अधिक खेळाडू दीर्घ कालावधीनंतर संघात परतत आहेत. अशा परिस्थितीत, त्या खेळाडूंना सराव देण्यासाठी बीसीसीआयने वरिष्ठ संघ आणि भारत-अ खेळाडूंमध्ये सराव सामना आयोजित केला आहे, जो तीन दिवसांचा आहे. या सामन्यात सरफराजने शतक झळकावले आहे.

हेही वाचा: IPL Auction 2024: “RCB भाग्यवान आहे की पॅट कमिन्सला विकत घेतले नाही “, माजी भारतीय क्रिकेटपटू असे का म्हणाला? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत-अ संघातर्फे सरफराज दक्षिण आफ्रिकेत आहे. प्रिटोरिया येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात सरफराजने ६३ चेंडूत शतक झळकावले. त्याच्या फलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्वत कवेरप्पा, रवींद्र जडेजा, हर्षित राणा यांसारख्या खेळाडूंविरुद्ध सरफराजने ही खेळी खेळली. सरफराजच्या खेळीचा व्हिडीओ त्याचा लहान भाऊ मुशीर खान याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सरफराज चौकार आणि षटकार मारताना दिसत आहे. त्याच्याबरोबरअभिमन्यू ईश्वरनही फलंदाजी करताना दिसत आहे. ईश्वरननेही अर्धशतक झळकावले. यावेळी दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ कसोटी मालिका जिंकत इतिहास रचणार का? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.