गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या वनडेत भारताने श्रीलंकेवर ६७ धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीच्या शानदार शतकामुळे भारतीय संघाने ३७३ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, प्रत्युत्तरात श्रीलंकेला ३०६ धावा करता आल्या. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकानेही आपले शतक पूर्ण केले. ९८ धावांवर तो धावबाद होणार होता, पण टीम इंडियाने त्याला जीवदान दिले.

श्रीलंकेच्या डावाच्या शेवटच्या षटकात दासुन शनाका ९८ धावांवर खेळत असताना मोहम्मद शमीने मंकडिंग धावबाद केले. मोहम्मद शमीने अंपायरकडे अपील केले, त्यानंतर फील्ड अंपायर थर्ड अंपायरकडे वळले. मात्र, यादरम्यान कर्णधार रोहित शर्माची एन्ट्री झाली आणि त्याने मोहम्मद शमीशी यावर चर्चा केली. त्यानंतर टीम इंडियाने धावबादची अपील मागे घेतली.

सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये कर्णधार रोहित शर्माने याचा खुलासा केला. रोहित शर्माने सांगितले की, मोहम्मद शमीने अपील केली होती, पण दासुन ९८ धावांवर खेळत होता. त्याने शानदार फलंदाजी करत होता आणि आम्हाला त्याला अशा प्रकारे बाद करायचे नव्हते. आम्हाला त्याला योग्य मार्गाने बाद करायचे होते, पण मंकडिंग त्यांच्यापैकी नव्हता. यामुळेच आम्ही आमची अपील मागे घेतली.

हेही वाचा – IND vs SL 1st ODI: हिटमॅनने मोडला हाशिम आमलाचा मोठा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पाचवा खेळाडू

टीम इंडियाने अपील मागे घेतल्यानंतर दासून शनाकाने आपले शतक पूर्ण केले. दासूनने ८८ चेंडूत १०३ धावांची खेळी खेळली, या खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकार मारले. या खेळीनंतरही श्रीलंकेला सामना जिंकता आला नाही. श्रीलंका ५० षटकांत ३०६ धावा केल्या. श्रीलंकेने हा सामना ६७ धावांनी गमावला. तसेच ते आता ३ सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहेत.