भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. गुवाहाटीमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ६७ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामध्ये भारताने विराट कोहलीच्या ११३ आणि कर्णधार रोहित शर्माच्या ८३ धावांच्या जोरावर ३७३ धावसंख्येचा डोंगर उभारला होता. यामधील दुसरा सामना गुरूवारी (१२ जानेवारी) कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मैदानावर जेव्हा हे दोन संघ एकदिवसीय सामन्यामध्ये शेवटी समोरा-समोर आले होते, तेव्हा मर्यादित षटकांच्या सामन्यांचा इतिहास बदलला होता.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना जिंकून मालिकेत २-० अशी अजेय आघाडी मिळवण्याकडे टीम इंडियाचे लक्ष असेल. मात्र त्यादरम्यान नाणेफेकीवेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मजेदार वक्तव्य केले. पाहुण्या संघाने सलग दोनवेळा नाणेफेक जिंकली. मात्र यावेळी भारताची भक्कम फलंदाजी पाहता त्यांनी धावांचा बचाव करण्याचे आव्हान स्विकारले.

नाणेफेकीवेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “मी द्विधा मनस्थितीत होतो. मागच्या वेळी आम्ही प्रथम फलंदाजी करताना चांगल्या धावा केल्या होत्या त्यामुळे आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती. पण ईडन गार्डनचे मैदान बघून मला क्षेत्ररक्षण करायचे असा विचार देखील डोक्यात येऊन गेला. एकूणच काय तर संघासाठी धावांचे रक्षण आणि पाठलाग या दोन्ही गोष्टींची सवय व्हायला हवी. त्यामुळे संघात आणखी काही कमी असेल तर तिथे सुधारणा करता येऊ शकते.”

रोहित पुढे म्हणाला की, “विशेषत म्हणजे. आपण भूतकाळात जे केले आहे ते भूतकाळात आहे, आयुष्यात पुढे पाहणे आणि अधिक चांगले करत राहणे आवश्यक आहे. मला येथे नेहमीच खेळायला आवडते, क्रिकेट रसिकांची गर्दी आणि उत्साह हा मला नेहमीच प्रेरित करतो. फलंदाजीत मला नव्याने सुरुवात करायची आहे.”

हेही वाचा: IND vs SL: “खराब चेंडूवर बाद होतो आहे केएल राहुल, प्रशिक्षक द्रविड यांनी…” भारताच्या माजी कर्णधारने डागली तोफ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजच्या सामन्यात भारतीय संघाने एक बदल केला असून फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या जागी त्याचाच मित्र कुलदीप यादवला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले आहे. श्रीलंकेच्या डावाला सुरुवात झाली असून सलामीवीर आविष्का आणि कुशल मेंडीस यांच्याकडून चांगल्या भागीदारीची संघाला अपेक्षा असणार आहे. भारतासाठी मात्र विकेट्स लवकर घेत कमी धावसंख्येवर कसे रोखता येईल हे गरजेचे आहे. सध्या श्रीलंकेची धावसंख्या २१-० अशी आहे.