श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली, तेव्हा अनेक धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले. शिखर धवनला वनडे संघातून वगळण्यात आले आहे, बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याची कामगिरी चांगली नव्हती. संघाच्या घोषणेनंतर शिखर धवनने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

बुधवारी शिखर धवनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो व्यायाम करत आहे. शिखर धवनने असेही लिहिले की, ”हे विजय किंवा पराभवाचे नाही, ते हृदयाशी संबंधित आहे. काम करत राहा आणि बाकी देवावर सोडा.”

हेही वाचा – सूर्यकुमार यादवचा खुलासा; उपकर्णधार पदी निवड झाल्याची बातमी सर्वात पहिल्यांदा ‘या’ व्यक्तीने दिली होती

शिखर धवन काही काळ एकदिवसीय संघाचा भाग होता. ज्या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली किंवा केएल राहुल नव्हते, त्या मालिकेत शिखर धवनने टीम इंडियाचा कर्णधार होता. असे मानले जात होते की, २०२२ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडीच सलामी देऊ शकतो, परंतु अलीकडच्या काळात शिखर धवनच्या फॉर्मने त्याला साथ दिली नाही आणि बांगलादेश मालिकेतील अपयशानंतर त्याला वनडे संघातून वगळण्यात आले.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत शिखर धवनने केवळ ७, ८, ३ धावा केल्या. जर आपण त्याचा एकदिवसीय विक्रम पाहिला तर त्याने १६७ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या ४४ च्या सरासरीने ६७९३ धावा आहेत. शिखर धवनच्या नावावर १७ शतके आहेत. त्याचवेळी, त्याने ३४ कसोटी सामन्यांमध्ये कसोटीत ४० च्या सरासरीने २ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

आणखी वाचा – India vs Sri Lanka : भारत विरुद्ध श्रीलंका पहिला ट्वेन्टी-२० सामना कधी? कुठं मोफत पाहता येणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.