IND vs SL, Asia Cup 2023: भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २१३ धावा केल्या. आशिया चषक २०२३मध्ये टीम इंडियाला दुसऱ्यांदा पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत आणि संपूर्ण संघ ४९.१ षटकात २१३ धावांवर बाद झाला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर लोकेश राहुलने ३९ धावांचे, इशान किशनने ३३ धावांचे आणि अक्षर पटेलने २६ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालगेने पाच विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, चरित असलंकाने चार विकेट्स घेतल्या. शेवटची विकेट महिष तिक्षीनाच्या नावावर होती. भारताच्या सर्व १० विकेट्स फिरकी गोलंदाजांनी घेतल्या.

जसप्रीत बुमराहचा पाय मुडपला

भारताने ठेवलेल्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची फलंदाजी सुरू झाली, त्यावेळी बुमराहने भारतासाठी पहिले षटक टाकले. बुमराह ते षटक टाकताना चौथा चेंडू टाकल्यानंतर खेळपट्टी ओलसर असल्याने त्याचा पाय मुडपला. त्यावेळी सर्वच भारतीयांचा एका क्षणासाठी काळजाचा ठोका चुकला. मात्र, पुढचे दोन चेंडू त्याने टाकले आणि चांगली गोष्ट म्हणजे तो तंदुरुस्त आहे. काहीवेळासाठी तो त्यावर उपचार करण्यासाठी गेला होता, ज्यामुळे पायाचा घोटा मुडपला होता त्याने ते बूट देखील बदलले.

Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
IPL 2024 Match Ticket Price Updates in Marathi
IPL 2024 : गुणतालिकेत नीचांकी, तिकीटं उच्चांकी; आरसीबीच्या मॅचच्या तिकिटाला मात्र ५० हजारांचा भाव
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

हेही वाचा: Asia Cup 2023: पाकिस्तान संघाला मोठा धक्का! नसीम शाहसह ‘हा’ गोलंदाज दुखापतीमुळे आशिया कप मधून होऊ शकतो बाहेर

जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरत नुकताच भारतीय संघात परतला आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तो भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. याआधी बुमराहला दुखापतीमुळे टी२० वर्ल्ड कप व आशिया चषक स्पर्धेला मुकावे लागले होते. आज पहिल्याच षटकात सर्वांचं टेंशन वाढवणारा प्रसंग घडला. त्यानंतर बुमराहने भारताला दोन विकेट्स देखील काढून दिले. सात धावांवर श्रीलंकेची पहिली विकेट पडली. पाथुम निसांका ७ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला यष्टिरक्षक लोकेश राहुलकडे झेलबाद केले. कुसल मेंडिस १६ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले.

भारताच्या डावात काय घडले?

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी पाहता शार्दुल ठाकूरच्या जागी टीम इंडियाने अक्षर पटेलला संधी दिली. रोहित आणि गिलच्या जोडीने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली. दोघांनी मिळून पॉवरप्लेमध्ये ६५ धावा जोडल्या. रोहित आणि गिल यांच्यात ११.१ षटकात पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी झाली.

गिलला क्लीन बॉलिंग करून ड्युनित वेलल्गेने ही भागीदारी तोडली. पुढच्याच षटकात त्याने विराट कोहलीलाही तीन धावांवर बाद केले आणि आपल्या तिसऱ्या षटकात वेलल्गेनेही रोहितला बोल्ड केले आणि टीम इंडिया अडचणीत आली. बाद होण्यापूर्वी रोहितने ४८ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. आशिया चषक स्पर्धेत त्याने सलग तिसऱ्या डावात अर्धशतक झळकावले आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०,००० धावाही पूर्ण केल्या. हे त्याचे वन डेतील ५१वे अर्धशतक होते.

हेही वाचा: IND vs SL, Asia Cup: श्रीलंकन फिरकीपटूंसमोर टीम इंडियाने टेकले गुडघे, विजयासाठी ठेवले अवघे २१४ धावांचे आव्हान

भारताच्या ९१ धावांवर तीन विकेट्स पडल्यानंतर इशान किशन आणि लोकेश राहुलने डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली आणि टीम इंडियाची धावसंख्या १५० धावांच्या पुढे गेली. ३९ धावांवर लोकेश राहुलला बाद करत वेललगेने भारताला चौथा धक्का दिला. काही वेळाने इशान किशनही ६१ चेंडूत ३३ धावांची झुंजार खेळी करत चरित असलंकाचा बळी ठरला. पुढचे षटक वेलाल्गेच्या स्पेलचे शेवटचे षटक होते आणि त्याने शेवटच्या चेंडूवर पाच धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर हार्दिक पांड्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वेललागेने प्रथमच एकदिवसीय सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

रवींद्र जडेजाही १९ चेंडूत ४ धावा काढून असलंकाचा बळी ठरला. त्यानंतर पाच धावांवर असलंकाने बुमराहला बोल्ड केले. पुढच्याच चेंडूवर कुलदीपही खाते न उघडताच बाद झाला. भारताने १८६ धावांत नऊ विकेट्स गमावल्या होत्या. अशा स्थितीत सिराज आणि अक्षर यांनी शेवटच्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली आणि भारताची धावसंख्या २१३ धावांपर्यंत नेली. मात्र, टीम इंडियाला या स्पर्धेत दुसऱ्यांदा पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत आणि ४९.१ षटकांत २१३ धावा झाल्या. वेलालगेच्या पाच बळींशिवाय श्रीलंकेकडून चारिथ असलंकाने चार विकेट्स घेतल्या. महेश तिक्षणा एक विकेट मिळाली. या डावात सर्व विकेट्स फिरकी गोलंदाजांनी घेतल्या.