scorecardresearch

IND vs SL: टीम इंडियाच्या पराभवानंतरही संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे आनंदी? कारण ऐकून वाटेल आश्चर्य

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आनंदात आहेत. त्याने सामन्यानंतर अक्षर पटेलचे कौतुक केले आणि त्याच्या आनंदाची दोन कारणे सांगितली.

IND vs SL: टीम इंडियाच्या पराभवानंतरही संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे आनंदी? कारण ऐकून वाटेल आश्चर्य
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघ १६ धावांनी पराभूत झाला. उभय संघांतील हा सामना पुण्याच्या एमसीएस स्टेडियवर खेळला गेला असून भारत लक्ष्य गाठू शकला नाही. संघात रोहित शर्मा, विराट कोहली हे दिग्गज खेळत नसताना हार्दिक पंड्या कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. हार्दिकच्या नेतृत्वात भारताने पहिला टी२० सामना कसाबसा जिंकला, पण दुसऱ्या सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला. यानंतरही भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आनंदी आहे.

भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजीच्या अष्टपैलू विभागावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड खूश आहेत. आणि ते म्हणाले की सध्या या विभागात संघ खूप मजबूत आहे. रवींद्र जडेजा लवकरच संघात असेल जो भारताला फिरकी अष्टपैलू विभागात मजबूत करेल, असे संकेत द्रविडने दिले. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताचा १६ धावांनी पराभव झाल्यानंतर द्रविड म्हणाला की, मला वाटतं की आमचा फिरकी अष्टपैलू विभाग सध्या खूप मजबूत आहे.

भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजीच्या अष्टपैलू विभागावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड खूश असून, सध्या या विभागात संघ खूप मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले. रवींद्र जडेजा लवकरच संघात असेल जो भारताला फिरकी अष्टपैलू विभागात मजबूत करेल, असे संकेत द्रविडने दिले.

हेही वाचा: Asia Cup 2023: …नाद करायचा नाय! भारताशी पंगा घेणं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पडले महागात, दिले चोख प्रत्युत्तर

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताचा १६ धावांनी पराभव झाल्यानंतर द्रविड म्हणाला, ‘मला वाटतं की सध्या आमचा फिरकी अष्टपैलू विभाग खूप मजबूत आहे. शाहबाज अहमद देखील संघाचा एक भाग होता. वॉशिंग्टन सुंदरही आहे आणि मग जडेजाही येईल. आम्ही संघासह आनंदी आहोत.”

या सामन्यात अक्षर पटेलने ३१ चेंडूत ६५ धावा केल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. यामुळे त्याचे पर्याय वाढले आहेत, असे प्रशिक्षक म्हणाले.तो म्हणाला की, जेव्हा-जेव्हा त्याला टी२० क्रिकेटमध्ये संधी मिळाली तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली आहे. हे एक चांगले लक्षण आहे. त्याच्या, सुंदर आणि जडेजासारखे खेळाडू आल्याने आमच्याकडे आणखी पर्याय असतील.

हेही वाचा: Shreyas Iyer: “अरे भावा, मी काही मनावर घेत नाही…”, निराशेचा सूर आळवणाऱ्यांना श्रेयस अय्यरने दिले मन जिंकणारे उत्तर

शिवम मावीच्या वेगवान गोलंदाजीच्या कामगिरीवर कर्णधार हार्दिक पांड्याखूप खूश असल्याचेही प्रशिक्षकाने सांगितले. या सामन्यात मावीनेही जलद २६ धावा केल्या. द्रविड म्हणाला, “वेगवान गोलंदाजीमध्ये आम्ही हार्दिकवर खूप अवलंबून आहोत. इतर खेळाडूंनीही पुढे यावे अशी आमची इच्छा आहे. मावीची फलंदाजी पाहून बरे वाटले. त्यामुळे कर्णधाराच्या चेहऱ्यावर हसू उमटले. वेगवान गोलंदाजांची अशी फलंदाजी पाहून बरे वाटले.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 17:15 IST

संबंधित बातम्या