IND vs WI 1st Test Day 1 Live Updates in Marathi: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. पहिला कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील भारताची घरच्या मैदानावरील पहिली कसोटी मालिका खेळवली जात आहे. नवा कर्णधार शुबमन गिलच्या घरच्या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी संघाचे नेतृत्त्व करणार आहे. तर वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्त्व रॉस्टन चेस करत आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमधील गेल्या ९ कसोटी सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे आणि हाच रेकॉर्ड संघ कायम कायम ठेवायचा प्रयत्न करेल.
पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ १६२ धावांवर सर्वबाद झाला. मोहम्मद सिराजने ४, बुमराहने ३, कुलदीपने २ तर वॉशिंग्टनने १ विकेट घेतली. फलंदाजीत भारताची सुरूवात चांगली झाली. जैस्वाल आणि राहुलने अर्धशतकी भागीदारी रचली. यानंतर साई सुदर्शन स्वस्तात बाद झाला. केएल राहुलला हॅमस्ट्रिंगचा त्रास होत असतानाही त्याने अर्धशतकी खेळी केली. यासह भारताने पहिल्या दिवशी २ बाद १२१ धावा केल्या आहेत. यासह टीम इंडिया ४१ धावांनी मागे आहे.
केएल राहुल अर्धशतक
केएल राहुलने अहमदाबाद कसोटीतील पहिल्या डावात अर्धशतक केलं आहे. राहुलने १०१ चेंडूत ६ चौकारांसह ५० धावा केल्या आहेत. यासह भारताने १ विकेट गमावत ११३ धावा केल्या आहेत.
साई सुदर्शन झेलबाद
रॉस्टन चेसने साई सुदर्शनला पायचीत करत भारताला दुसरा धक्का दिला. दरम्यान भारताने १०० धावांचा टप्पा गाठला आहे, केएल राहुलला पायाला दुखापत झाल्याचा त्रास होत आहे.
भारताला पहिला धक्का
चांगल्या सुरूवातीनंतर टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. जेडन सील्सने १९व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याला विकेटकिपरकरवी झेलबाद केलं. यशस्वी ५४ चेंडूत ७ चौकारांसह ३६ धावा करत माघारी परतला.
जैस्वालची चौकारांची आतिषबाजी
भारत-वेस्ट इंडिज कसोटी सामन्याला पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरूवात झाली आहे. ब्रेकनंतर यशस्वी जैस्वालने चौकारांची फटकेबाजी सुरू केली आहे. त्याने एका षटकात ३ चौकार लगावले आहेत. यासह केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी अर्धशतकी भागीदारी केली आहे.
अहमदाबादमध्ये भारत-वेस्ट इंडिज सामन्यात व्यत्यय
अहमदाबादमध्ये भारत-वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ १६२ धावांवर सर्वबाद झाला आहे. तर भारताच्या डावात १२ षटकांनंतर पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस आल्याने सामना थांबवण्यात आला आहे, भारताने १२.४ षटकांत एकही विकेट न गमावता २३ धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिज ऑल आऊट
कुलदीप यादवने वेरिकनला झेलबाद करत वेस्ट इंडिजला ऑलआऊट केलं आहे. वेस्ट इंडिजचा संघ १६२ धावांवर सर्वबाद झाला आहे. मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स, जसप्रीत बुमराहने ३ विकेट्स, कुलदीप यादवने २ विकेट्स तर वॉशिंग्टनने एक विकेट घेतली.
बुमराहने दोन भन्नाट चेंडू
जसप्रीत बुमराहने ३९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जस्टिन ग्रीव्हसला कमालीच्या यॉर्करवर क्लीन बोल्ड केलं आहे. ग्रीव्हसने ३२ धावा करत संघाचा डाव सावरला होता, पण बुमराहने त्याला क्लीन बोल्ड करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. तर पुढील षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने जॉन लेनला क्लीन बोल्ड केलं आणि संघाने नववी विकेट पटकावली.
वॉशिंग्टनच्या खात्यात विकेट
जसप्रीत बुमराहने ३९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जस्टिन ग्रीव्हसला कमालीच्या यॉर्करवर क्लीन बोल्ड केलं आहे. ग्रीव्हसने ३२ धावा करत संघाचा डाव सावरला होता, पण बुमराहने त्याला क्लीन बोल्ड करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. तर पुढील षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने जॉन लेनला क्लीन बोल्ड केलं आणि संघाने नववी विकेट पटकावली.
सिराजच्या खात्यात चौथी विकेट
मोहम्मद सिराजच्या कमालीच्या चेंडूवर कर्णधार रोस्टन चेसला झेलबाद केलं. ध्रुव जुरेलने विकेटच्या मागे कमालीचा झेल टिपला. यासह वेस्ट इंडिजने २७ षटकांत ६ बाद १०९ धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिजने पहिल्या सत्रात किती धावा केल्या?
वेस्ट इंडिजने पहिल्याच सत्रात ५ विकेट्स गमावत ९० धावा केल्या आहेत. भारताने उत्कृष्ट गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना फार काळ मैदानात टिकू दिलं नाही. मोहम्मद सिराजने ३ तर बुमराह-कुलदीपने १-१ विकेट घेतल्या.
कुलदीपने वेस्ट इंडिजला दिला ५वा धक्का
भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने शे होपला क्लीन बोल्ड करत संघाला अजून एक महत्त्वाची विकेट मिळवून दिली. ४ विकेट्स गमावल्यानंतर होप आणि चेस भागीदारी रचत होते. पण कुलदीपने लंचब्रेकआधी त्याला माघारी धाडलं.
सिराजने ब्रेंडन किंगला केलं क्लीन बोल्ड
मोहम्मद सिराजने १० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ब्रेंडन किंगला क्ली बोल्ड करत माघारी धाडलं. यासह टीम इंडियाला तिसरी विकेट मिळाली आहे. सिराजने विकेट घेताच Siuuu सेलिब्रेशन करत विकेटचा आनंद साजरा केला. सिराजने स्पेलमधील पुढच्याच षटकात अथानेजला झेलबाद केलं. यासह सिराजचे पहिल्याच कसोटीत ३ विकेट्स घेतल्या आहेत.
टीम इंडियाच्या खात्यात दुसरी विकेट
जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. सातव्या षटकातील बुमराहच्या पहिल्या चेंडूवर कॅम्पबेलच्या बॅटची कड घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला. जुरेलने कमालीचं यष्टीरक्षण करत रिव्ह्यू घेण्यातही मोठी भूमिका बजावली आणि भारताला दुसरी विकेट मिळाली आहे.
मोहम्मद सिराजने संघाला मिळवून दिला पहिली ब्रेकथ्रू
मोहम्मद सिराजने इंग्लंडमधील कसोटी मालिकेतील फॉर्म कायम ठेवत वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यात गोलंदाजीला सुरूवात केली आहे. सिराजने त्याच्या स्पेलमधील दुसऱ्याच षटकात संघाला विकेट मिळवून दिली. सिराजच्या कमालीच्या चेंडूची कड घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला आणि ध्रुवने उत्कृष्ट झेल टिपला. यासह सिराजने १२ धावांवर संघाला पहिली विकेट मिळवून दिली. सिराजने सुरूवातीची दोन्ही मेडन षटकं टाकली असून एक विकेट घेतली.
सामन्याला सुरूवात
वेस्ट इंडिजकडून जॉन कॅम्पबेल व तेजनारायण चंद्रपॉल ही जोडी सलामीला उतरली आहे. बुमराहच्या पहिल्या षटकात बायच्या चार धावा, तर सिराजने पहिलं मेडन षटक टाकलं. बुमराहच्या दुसऱ्या षटकात कॅम्पबेलने दोन चौकार लगावले.
भारताची वेस्ट इंडिजविरूद्ध पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
वेस्ट इंडिजची प्लेईंग इलेव्हन
तेजनारायण चंदरपॉल, जॉन कॅम्पबेल, अलिक अथानाझे, ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक), रोस्टन चेस (कर्णधार), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॅरिकन, खारी पियरे, जोहान लेन, जेडेन सील्स
भारतीय संघाचे नवीन जर्सी स्पॉन्सर
भारतीय संघाला नवीन जर्सी पार्टनर अखेरीस मिळाले आहेत. अपोलो टायर्स भारताचे नवीन जर्सी स्पॉन्सर असतील. गिलने नाणेफेकीनंतर नवी जर्सी दाखवत अपोलो टायर्सचा जर्सीवरील लोगो दाखवला.
भारत-वेस्ट इंडिज पहिल्या कसोटीची नाणेफेक कोणी जिंकली?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याची नाणेफेक झाली असून वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यासह भारतीय संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. भारतीय संघ ३ फिरकीपटू आणि २ वेगवान गोलंदाजांसह आणि एका अष्टपैलू खेळाडूसह उतरला आहे. तर फलंदाजीत देवदत्त पडिक्कलला संधी मिळालेली नाही.