Yashasvi Jaiswal Record: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर सुरू आहे. पहिल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताकडून फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालने पहिल्याच सत्रात आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नव्हती. पण दुसऱ्या कसोटीतील पहिल्याच डावात यशस्वी जैस्वालने दमदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना ३००० धावांचा पल्ला गाठला आहे. यशस्वीने सर्वाधिक धावा या कसोटी क्रिकेटमध्ये केल्या आहेत. कारण त्याला वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये फार सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही.
यशस्वी जैस्वालला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून अवघे २ वर्ष झाले आहेत. त्याला एक वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. यासह त्याला टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी दिली गेली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना २५ कसोटी सामन्यांमधील ४७ डावात २२४५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ शतकं आणि १२ अर्धशतकं झळकावली आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २३ सामन्यांमध्ये ७२३ धावा केल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने १ शतक आणि ५ अर्धशतकं झळाकावली आहेत. तर एकमेव वनडे सामन्यात त्याला अवघ्या १५ धावा करता आल्या होत्या. ह सर्व मिळून त्याने ३००० धावा पूर्ण केल्या आहेत.
मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडिमयवर सुरू आहे. या सामन्यात कर्णधार शुबमन गिलने नाणेफेत जिंसून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शुबमन गिलने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून पहिल्यांदाच नाणेफेक जिंकलं आहे. पहिल्या डावा फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालने अर्धशतक झळकावलं आहे.