India vs West Indies 2nd Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. पावसामुळे शनिवारी खेळात व्यत्यय आला. यामुळे आजचा सामना अर्धा तास आधी सुरू झाला. भारताने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५५ धावात आटोपला असून भारताच्या मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी करत ५ विकेट्स घेतले. टीम इंडियाला पहिल्या डावात १८३ धावांची भक्कम आघाडी मिळाली आहे.

वेस्ट इंडिजचा पहिला डाव चौथ्या दिवशी २५५ धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला १८३ धावांची आघाडी मिळाली. मात्र, विंडीजने फॉलोऑन वाचवला आहे. मोहम्मद सिराजने भारतासाठी जबरदस्त गोलंदाजी करताना पाच विकेट्स घेतल्या. त्याचवेळी मुकेश कुमार आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत त्यांना साथ दिली.

वेस्ट इंडिजने आज २२९/५ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि त्यांना त्यांच्या धावसंख्येत २६ धावांचीच भर घालता आली. अर्ध्या तासाच्या आत त्यांनी पाच विकेट्स गमावल्या. आज वेस्ट इंडिजला पहिला झटका अ‍ॅलिक अथानेझच्या रूपाने बसला. त्याला नवोदित मुकेशने एलबीडब्ल्यू आऊट केले. अथनाजेला ३७ धावा करता आल्या. यानंतर सिराजचा कहर पाहायला मिळाला आणि उर्वरित चार विकेट घेत त्याने विंडीजचा डाव गुंडाळला. त्याने जेसन होल्डर (१५), अल्झारी जोसेफ (४), केमार रोच (४) आणि शॅनन गॅब्रिएल (०) यांना बाद केले. जोमेल वॅरिकन सात धावा करून नाबाद राहिला.

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजला पहिला झटका शुक्रवारी तेजनारायण चंद्रपॉलच्या रूपाने बसला. त्याला ३३ धावा करता आल्या. त्याने कर्णधार क्रेग ब्रॅथवेटसोबत ७१ धावांची सलामीची भागीदारी केली होती. तिसऱ्या दिवशी (शनिवारी) वेस्ट इंडिजने एका विकेटच्या मोबदल्यात ८६ धावांनी पुढे खेळण्यास सुरुवात केली. ब्रेथवेटने कर्क मॅकेन्झीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. मुकेशने मॅकेन्झीला बाद करून ही भागीदारी तोडली. मुकेशची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय विकेट होती. ब्रेथवेटने कर्णधारपदाची खेळी खेळताना १७० चेंडूत कसोटी कारकिर्दीतील २९वे अर्धशतक झळकावले.

हेही वाचा: IND vs WI: “रोहित शर्मा हा कर्णधार म्हणून…” हिटमॅनची भेट घेतल्यानंतर WI विंड बॉल संघाची कर्णधार केरनचे मोठे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर ब्रेथवेटने जर्मेन ब्लॅकवुडसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. अश्विनचा चेंडू ब्रॅथवेटला. त्याने २३५ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७५ धावा केल्या. सिराजने जोशुआ दा सिल्वाला क्लीन बोल्ड केले.