भारतीय क्रिकेट संघ आज बुधवारी वेस्ट इंडीजविरुद्ध दुसरा वनडे सामना खेळत आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरताच माजी कर्णधार विराट कोहलीने नवा विक्रम रचला आहे. विराटने खास शतक ठोकले आणि अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

भारतीय भूमीवर १०० वनडे सामने खेळणारा विराट हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. विराटने कारकिर्दीतील २५९वा वनडे सामना खेळताना ही कामगिरी केली. पहिल्या वनडेत ८ धावांची खेळी करत विराटने ५ हजार धावा पूर्ण केल्या. आता त्याने मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अजून एक विक्रम नोंदवला आहे.

हेही वाचा – IND vs NZ : एकमेव टी-२० सामन्यात टीम इंडियाचा पराभव; फलंदाज ठरले फ्लॉप!

विराटपूर्वी सचिन तेंडुलकर (१६४), महेंद्रसिंह धोनी (१३०), मोहम्मद अझरुद्दीन (११३) आणि युवराज सिंग (१११) यांनी मायदेशात १०० पेक्षा जास्त वनडे सामने खेळले आहेत. आता विराटने या माजी दिग्गज खेळाडूंच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे. विराट गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करू शकलेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा मानस कप्तान रोहित शर्माचा असेल. आजच्या सामन्यात कायरन पोलार्ड दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे निकोलस पूरन वेस्ट इंडीजचे नेतृत्व करत आहे. त्याने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात केएल राहुलचे पुनरागमन झाले असून इशान किशन संघाबाहेर आहे.