IND vs ZIM 1st ODI: राष्ट्रगीत सुरू होताच केएल राहुलने तोंडातील च्युईंग गमचे काय केले? Video सोशल मीडियावर व्हायरल

KL Rahul Chewing Gum Video: पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीनंतर दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात जमले होते.

IND vs ZIM 1st ODI: राष्ट्रगीत सुरू होताच केएल राहुलने तोंडातील च्युईंग गमचे काय केले? Video सोशल मीडियावर व्हायरल
फोटो सौजन्य – ट्विटर

भारतीय क्रिकेट संघ सध्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेला आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली संघ खेळत आहे. गुरुवारी (१८ ऑगस्ट) झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात राहुलला फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही. असे असूनही सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीनंतर दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात जमले होते. तेव्हा कर्णधार केएल राहुल च्युईंग गम चघळत मैदानावर पोहोचला आणि सहकाऱ्यांसोबत रांगेत उभा राहिला. पण, भारताचे राष्ट्रगीत सुरू करण्याची घोषणा होताच त्याने झटकन तोंडातून च्युईंग गम काढले व तो सावधान स्थितीत उभा झाला. त्याची ही कृती कॅमेऱ्यात चित्रित झाली. सोशल मीडियावर राहुलचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

केएलच्या या कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तुम्ही कोणत्याही स्थितीत तुमच्या देशाच्या राष्ट्रगीताचा आदर केला पाहिजे, असे त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिल्याचे चाहते म्हणाले आहेत. राष्ट्रगीताचा सन्मान करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. केएल राहुलने हेच केले. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.

हेही वाचा – बॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारणारा खेळाडू व्हीलचेअरवर! माईक टायसनचे विमानतळावरील फोटो व्हायरल

दरम्यान, गुरुवारी हरारे स्पोर्ट्स क्लब येथील मैदानावर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा १० गडी राखून पराभव केला. सलामीवीर शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी नाबाद १९२ धावांची भागीदारी केली. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताकडे १-० अशी आघाडी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारणारा खेळाडू व्हीलचेअरवर! माईक टायसनचे विमानतळावरील फोटो व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी