India A vs South Africa A One Day Team: भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. येत्या १४ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पण यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये वनडे मालिका सुरू होणार आहे. या अ संघांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. याचं नेतृत्त्व तिलक वर्मा करणार आहे.
भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील एकदिवसीय मालिकेसाठी तिलक वर्माची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची या मालिकेसाठी निवड झाली नसल्याच्या वृत्तालाही दुजोरा मिळाला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका अ संघांमधील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, सर्व सामने गुजरातमधील राजकोट येथे खेळवले जातील. ही मालिका भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघांमधील सध्या सुरू असलेल्या मालिकेचा एक भाग आहे. अजित आगरकरांच्या नेतृत्त्वाखालील निवड समितीने या संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये तिलक व्यतिरिक्त अभिषेक शर्मा, आयुष बदोनी आणि विपराज निगम सारख्या खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वरिष्ठ संघाची एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे, या अ मालिकेकडे एकदिवसीय मालिकेच्या तयारीची संधी म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे, या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा समावेश होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. सुरूवातीला सरावासाठी दोघांची संघात निवड होईल अशी चर्चा होती, पण संघ निवडीपूर्वी रोहित विराट अ संघांमधील मालिकेत खेळणार नसल्याचा रिपोर्ट समोर आला होता, जो अखेरीस खरा ठरला.
दक्षिण आफ्रिका अ संघाविरूद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय अ संघ
तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, इशान किशन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, निशांत सिंधू, विपराज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, खलील सिंग अहमद (यष्टीरक्षक)
