नवी दिल्ली : डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचे जवळपास १० वर्षांनंतर भारताच्या एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची रविवारी घोषणा करण्यात आली.

उनाडकटने नोव्हेंबर २०१३ नंतर भारतासाठी एकदिवसीय सामना खेळलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या जसप्रीत बुमराचे पुनरागमन मात्र पुन्हा लांबले आहे. बुमराने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अखेरचा सामना खेळला होता.मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १७ मार्चला होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणास्तव उपलब्ध नसेल. त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पंडय़ा संघाचे नेतृत्व करेल.

Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट