एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. ही स्पर्धा आठवडाभरावर आलेली असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा ऑलराऊंडर अक्षर पटेल वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे भारतीय संघाने हा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी आता अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याला स्थान देण्यात आलं आहे.

भारताचा ऑलराऊंडर अक्षर पटेल दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संघाबाहेर राहिला होता. परंतु, तो दुखापतीतून अद्यापही बरा झालेला नाही. त्यामुळे तो वर्ल्डकपमध्येही खेळू शकणार नाही. त्याच्या जागी आर अश्विन खेळणार आहे.

काय आहे अक्षर पटेलचा प्रवास?

२०१५- वर्ल्डकप संघात निवड पण एकाही सामन्यात संधी मिळाली नाही.

२०१९- वर्ल्डकप संघात निवड झाली नाही.

२०२३- वर्ल्डकप संघात निवड झाली पण दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने संघाबाहेर

काय आहे रवीचंद्रन अश्विनचा प्रवास?

२०११- वर्ल्डकप संघात निवड

२०१५- वर्ल्डकप संघात निवड

२०१९- वर्ल्डकप संघात निवड नाही

२०२३- वर्ल्डकप संघात निवड नाही पण अक्षर पटेलला झालेल्या दुखापतीमुळे संघात स्थान

Story img Loader