सिंधूसह मोहिता-संजना यांना पराभवाचा धक्का
भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालने इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत संघर्षपूर्ण विजयासह उपांत्य फेरीत वाटचाल केली. मात्र पी.व्ही. सिंधूसह महिला दुहेरीत मोहिता सचदेव आणि संजना संतोष यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
सायनाने कोरियाच्या स्युंग जि ह्य़ूनवर १९-२१, २१-१४, २१-१९ अशी मात केली. पहिल्या गेममध्ये सायनाचा स्वैर खेळ आणि स्वत:च्या शैलीदार फटक्यांच्या जोरावर स्युंगने पहिल्या गेममध्ये बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये लौकिलाला साजेसा खेळ करत सायनाने १३-८ अशी आघाडी घेतली. ही आघाडी वाढवत सायनाने १९-१० अशी आगेकूच करत दुसऱ्या गेमवर कब्जा केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये स्युंगने घेतलेली आघाडी सायनाने मोडून काढत ११-७ अशी बढत घेतली. सलग सहा गुणांची कमाई करत स्युंगने १४-१२ अशी आगेकूच केली. झुंजार खेळ करत सायनाने प्रदीर्घ रॅलीवर भर देत सरशी साधली.
कोरियाच्या बेई येऑन ज्यू हिने सिंधूवर १५-२१, २१-१५, २१-१५ अशी मात केली. पहिला गेम जिंकल्यानंतरही सिंधूला पराभावाला सामोरे जावे लागले. नाआको फुकूमान आणि कुरुमी योनाओ जोडीने मोहिता सचदेव आणि संजना संतोष जोडीचा २१-८, २१-२ असा धुव्वा उडवला.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2016 रोजी प्रकाशित
सायना उपांत्य फेरीत
सिंधूसह मोहिता-संजना यांना पराभवाचा धक्का

First published on: 02-04-2016 at 03:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India open saina nehwal enters semis