बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषकात आज भारत विरुद्ध थायलंड यांच्यात उपांत्य फेरीतील पहिला सामना खेळला गेला. आजच्याच दिवशी आशिया चषकाचा दुसरा उपांत्य फेरीतील सामना हा पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे. टीम इंडियाने महिला आशिया चषकात लक्षवेधी कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली आहे. जेतेपदाचे एक प्रबळ दावेदार असणाऱ्या भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत थायलंडवर ७४ धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

या सामन्यात थायलंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. भारताने शफाली वर्मा आणि हरमनप्रीत कौर यांच्या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर २० षटकात ६ गडी गमावत १४८ धावसंख्या उभारली. या सामन्यासाठी हरमनप्रीत कौर कर्णधारपदावर परतली. ती मागील दोन सामने खेळली नव्हती. तिच्याबरोबर रेणुका ठाकुर आणि राधा यादव यांनीही अंतिम अकरामध्ये पुनरागमन केले आहे. त्यामुळे एस मेघना, मेघना सिंग आणि किरण नवगिरे यांना बाकावर बसावे लागले आहे.

थायलंडच्या केवळ दोघी फलंदाजानाच दुहेरी धावसंख्या करता आली, तर दोन फलंदाजाना भोपळाही फोडता आला नाही. मधल्या फळीतील बोचाथ्ममने २९ चेंडूत २१ धावा आणि सलामीवीर-यष्टीरक्षक नन्नापट कोंचाओएनकाय हिने ही २१ धावाच केल्या फक्त चेंडू जास्त खेळले. बोचाथ्ममला स्नेह राणाने बाद केले. मेघना सिंग हीने २ षटके टाकताना ६ धावा देत एक गडी बाद केला. तसेच दीप्तिने ४ षटकात ७ धावा देत ३ बळी घेतले. मागच्या सामनातील मालिकावीर राजेश्वरी गायकवाडने ४ षटकात १० धावा देत २ गडी बाद केले. फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करणारी शफाली वर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला तिनेही १ गडी बाद केला.

हेही वाचा :   मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : मुंबईचा सलग दुसरा विजय

तत्पूर्वी, भारतीय संघाची सलामीवीर शफाली वर्माने आक्रमक खेळी करत २८ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. पण जोडीदार स्मृती मंधाना मात्र १३ धावा करत मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाली. त्यानंतर या मालिकेत मधल्या फळीत दोन अर्धशतक करणारी जेमीमाह रोड्रिगेझ कर्णधार हरमनप्रीत च्या साथीने मोठे फटके मारत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. दोघींमध्ये ४२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. जेमीमाहने २६ चेंडूत २७ धावांची खेळी केली तर हरमनप्रीत कौरने ३० चेंडूत ३६ धावा केल्या. रिचा घोष लवकर बाद झाल्याने सर्व जबाबदारी ही पूजा वस्त्रकारवर आली तिने १३ चेंडूत १७ धावा करत भारताला १४० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली.

हेही वाचा :   शमी, सिराज, शार्दूलमध्ये स्पर्धा!; पाठीच्या दुखापतीमुळे चहरही ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थायलंडकडून टिपोचने भारताचे ३ गडी बाद करत ४ षटकात अवघ्या २४ धावा दिल्या. माया, पुथावोंग आणि बुचाथाम या तिघींनी प्रत्येकी १ गडी बाद करत भारताला १५० धावांच्या आत रोखले. आजच्या सामन्यातील विजयाने भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहचला असून १५ ऑक्टोबरला आशिया चषकाचा अंतिम सामना होणार आहे.