India vs Afghanistan 2nd T20 Highlights, 14 January 2024 : इंदूर टी-२० सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानवर ६ गडी राखून शानदार विजय नोंदवला. अफगाणिस्तानने भारतासमोर विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या शानदार खेळीमुळे अवघ्या १५.४ षटकांत ४ विकेट्स राखून लक्ष्य गाठले. अशा प्रकारे टीम इंडियाने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताकडून यशस्वी आणि शिवम यांनी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
IND vs AFG 2nd T20 Highlights : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ पहिले दोन टी-२० सामने जिंकून मालिकेत २-० ने आघाडीवर आहे.
भारताची अफगाणिस्तानवर सहा विकेट्सनी मात
भारताने दुसरा टी-20 सामना जिंकला आहे. भारताने 172 धावांचे लक्ष्य 15.4 षटकात 4 गडी गमावून पूर्ण केले. शिवम दुबेने 32 चेंडूत 63 धावांची नाबाद खेळी केली. जैस्वालने 34 चेंडूत 68 धावांची शानदार खेळी केली. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, अर्शदीप सिंगने तीन, अक्षर आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी दोन विकेट्स घेत अफगाणिस्तानला १७२ धावांत रोखले.
यशस्वी जैस्वाल 68 धावा करून बाद झाला. यशस्वीने 34 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि सहा षटकार मारले. करीम जनातच्या चेंडूवर रहमानउल्ला गुरबाजने त्याला झेलबाद केले. या सामन्यात जितेश शर्मा आपले खातेही उघडू शकला नाही. त्याला फक्त दोन चेंडूंचा सामना करता आला. करीम जनातच्या चेंडूवर तो मोहम्मद नबीकरवी झेलबाद झाला. जितेश बाद झाल्यानंतर रिंकू सिंग क्रीझवर आली आहे.
शिवम दुबेने सलग दुसऱ्या सामन्यात आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात 154 धावा केल्या आहेत. शिवम दुबे 55 धावा करून नाबाद आहे. यशस्वी जैस्वाल 68 धावा करून बाद झाला. यशस्वीने 34 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि सहा षटकार मारले. करीम जनातच्या चेंडूवर रहमानउल्ला गुरबाजने त्याला झेलबाद केले.
शिवम दुबेने 21 चेंडूत अर्धशतक केले. भारत विजयाच्या जवळ आहे. भारताची धावसंख्या 12.2 षटकात 2 गडी गमावून 154 धावा. जैस्वाल ६८ धावा करून खेळत आहे.
यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी करत 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दुबेही चांगली फलंदाजी करत असून त्याने 13 चेंडूत 27 धावा केल्या आहेत. भारताची धावसंख्या 100 च्या पुढे गेली आहे. फक्त 9.3 षटके खेळली गेली आहेत.
विराट कोहलीच्या रुपाने भारतीय संघाल दुसरा धक्का बसला आहे. कोहली 29 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहलीच्या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता. भारताची धावसंख्या 5.3 षटकात दोन विकेट गमावून 62 धावा. जैस्वाल 33 धावा करून खेळत आहे.
जैस्वाल आणि विराट कोहली अप्रतिम फलंदाजी करत आहेत. भारताची धावसंख्या अवघ्या 5 षटकांत 50 च्या पुढे गेली. जैस्वालने 16 चेंडूत 33 धावा केल्या आहेत. कोहलीने 13 चेंडूत 25 धावा केल्या आहेत. 5 षटकांनंतर भारताची धावसंख्या एक विकेट गमावून 58 धावा आहे.
या सामन्यातही रोहित शर्माचे खाते उघडले नाही. सलग दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित फजलहक फारुकीने क्लीन बोल्ड झाला. गेल्या सामन्यात रोहित शून्यावर धावबाद झाला होता. भारताने एका षटकात एका विकेटच्या मोबदल्यात पाच धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली क्रीजवर आहेत.
https://twitter.com/shaikhusman_7/status/1746558267910988256
अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा डाव सुरू झाला आहे. यशस्वी जैस्वाल कर्णधार रोहित शर्मासोबत क्रीझवर आला आहे. फजलहक फारुकीच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वीने चौकार ठोकला.
अफगाणिस्तानने 20 षटकात सर्वबाद 172 धावा केल्या. अशा प्रकारे टीम इंडियासमोर 173 धावांचे लक्ष्य आहे. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायबने 35 चेंडूत सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. याशिवाय नजीबुल्लाह, करीम जन्नत आणि मुजीब उर रहमान यांनी शेवटच्या षटकांमध्ये उपयुक्त खेळी खेळली. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ बळी घेतले. रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 2 यश मिळाले. शिवम दुबेने 1 विकेट आपल्या नावावर केली. तत्पूर्वी, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
अफगाणिस्तानचा सहावा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. अर्शदीप सिंगने नजीबुल्लाला बाद केले. नजीबुल्लाहने 21 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. आता अफगाणिस्तानची धावसंख्या 18 षटकांत 6 बाद 145 धावा आहे.
अफगाणिस्तानने 5 विकेट गमावून 104 धावा केल्या आहेत. रवी बिश्नोईने मोहम्मद नबीला रिंकू सिंगकरवी झेलबाद केले. नबी 14 धावा करून बाद झाला.
https://twitter.com/MollahShamim165/status/1746543279154380960
अक्षर पटेलने भारताला चौथे यश मिळवून दिले. त्याने गुलबदिन नायबचा डाव संपवला. नायबने शानदार फलंदाजी करत झंझावाती अर्धशतक झळकावले. तो 35 चेंडूत 57 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. नायबने आपल्या खेळीत पाच चौकार आणि चार षटकार मारले. अफगाणिस्तानने 13 षटकात 4 विकेट गमावत 98 धावा केल्या आहेत. मोहम्मद नबी 11 तर नजीबुल्ला झाद्रान एका धावेवर नाबाद आहे.
https://twitter.com/IndiaSportscafe/status/1746540229404819921
अफगाणिस्तानला तिसरा झटका शिवम दुबेच्या गोलंदाजीवर अजमतुल्ला ओमरझाईच्या रूपाने बसला. ओमरझाईने ४५ चेंडूत ३१ धावा केल्या.
https://twitter.com/KohliEuphoria18/status/1746533833300942861
फिरकीपटू अक्षर पटेलने डावाच्या सहाव्या षटकात इब्राहिम झद्रानला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. झाद्रान 10 चेंडूत 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अफगाणिस्तानने पहिल्या 6 षटकात 2 बाद 58 धावा केल्या आहेत.
रवी बिष्णोई यांनी येताच चमत्कार केला आहे. अफगाणिस्तानची पहिली विकेट 2.2 षटकात 20 धावांवर पडली. गुरबाज 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच कर्णधार रोहित शर्माने आपल्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला आहे. रोहित शर्माचा हा 150 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आहे. या अनोख्या विक्रमाला स्पर्श करणारा रोहित शर्मा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
150 कसोटी: अॅलन बॉर्डर (डिसेंबर 1993)
150 वनडे: ऍलन बॉर्डर (फेब्रुवारी 1987)
150 T20: रोहित शर्मा (जानेवारी 2024) *
अफगाणिस्तानची फलंदाजी सुरू झाली आहे. इब्राहिम झाद्रान आणि रहमानउल्ला गुरबाज ही सलामीची जोडी क्रीझवर दाखल झाली आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग भारतासाठी पहिले षटक टाकत आहे.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली 429 दिवसांनंतर पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. कोहली पहिल्या टी-20 सामन्यातून बाहेर होता. त्याने वैयक्तिक कारण सांगून मालिकेतील पहिल्या टी-20 मधून आपले नाव मागे घेतले होते. तो आजच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतान दिसेल.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
https://twitter.com/BCCI/status/1746519567390609773
अफगाणिस्तान : इब्राहिम झाद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झाद्रान, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन उल हक, मुजीब उर रहमान.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने दोन बदलांसह या सामन्यात प्रवेश केला आहे. शुबमन गिल आणि तिलक वर्मा यांच्या जागी विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
इंदूरची खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त ठरली आहे. येथे आतापर्यंत तीन आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी दोन सामने जिंकणाऱ्या संघाने 200 हून अधिक धावा केल्या होत्या. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 260 धावांची आहे. या मैदानावर भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही टी-20 मध्ये शतक झळकावले आहे. येथे सर्वात लहान धावसंख्या 142 धावा आहे. या सामन्यात भरपूर धावा होण्याची खात्री आहे. इंदूरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोन सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, एका सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ विजयी झाला आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी-२० सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. या कालावधीत पावसाची कोणतीही शक्यता नाही आणि संपूर्ण 40 षटकांचा सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय खेळला जाणे अपेक्षित आहे. सामन्यादरम्यान आकाश पूर्णपणे निरभ्र असेल. आर्द्रता 49 टक्के असेल आणि त्यामुळे खेळाडूंना कोणतीही अडचण येणार नाही. एकूणच इंदूरचे हवामान खेळाडू आणि प्रेक्षक दोघांसाठीही आनंददायी असेल. वाऱ्याचा वेग 13 किमी/तास असण्याची शक्यता आहे. यामुळे हवेत गारवा जाणवेल. रोमांचक क्रिकेट सामन्यासाठी हवामान आदर्श आहे. खेळाडूंना हवामानामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय कामगिरी करण्याची पुरेशी संधी मिळेल.
विराट टी-20 क्रिकेटमध्ये 12,000 धावा करणारा पहिला भारतीय आणि एकूण चौथा खेळाडू होण्यापासून 35 धावा दूर आहे. या सामन्यात विराटला हा खास टप्पा गाठायचा आहे. तो रोहितसोबत सलामीला येतो की तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो हे पाहायचे आहे.
इंदूरमध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. संघाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. मात्र या मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला होता.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहली खेळताना दिसणार आहे. वैयक्तिक कारणांमुळे तो पहिल्या सामन्यात खेळला नाही. १४ महिन्यांनंतर तो भारताकडून टी-२० क्रिकेट खेळणार आहे. २०२२ च्या टी-२० विश्वचषकापासून तो टी-२० क्रिकेटपासून दूर आहे.