Virat Kohli- Rohit Sharma Record In Adelaide: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते. कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी ७ महिन्यांनंतर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होती. पण दोघांनाही हवी तशी सुरुवात करता आलेली नाही.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या खेळपट्टीचा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. सलामीला आलेला रोहित शर्मा अवघ्या ८ धावा करून माघारी परतला. तर विराट कोहलीला खातंही उघडता आलं नाही. मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबरला ॲडलेडमध्ये खेळला जाणार आहे. दरम्यान ॲडलेडमध्ये कसा आहे विराट आणि रोहितचा रेकॉर्ड? जाणून घ्या.

ॲडलेडमध्ये कसा आहे विराट कोहलीचा रेकॉर्ड?

विराट कोहलीला ॲडलेडच्या मैदानावर ४ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. २०१२ ते २०१९ दरम्यान त्याने ४ सामन्यांमध्ये ६१ च्या सरासरीने २४४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २९१ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतकं झळकावली आहेत.

ॲडलेडमध्ये कसा आहे रोहित शर्माचा रेकॉर्ड?

ॲडलेडमध्ये रोहित शर्माला ६ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने २१ च्या सरासरीने १३१ धावा धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला एकही शतक किंवा अर्धशतक झळकावता आलेलं नाही.

ॲडलेडमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचा रेकॉर्ड

भारतीय संघाने या मैदानावर एकूण १५ सामने खेळले आहेत. यापैकी ९ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान १ सामना अनिर्णित राहिला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड पाहिला, तर ऑस्टेलियाने या मैदानावर ५४ सामन्यांपैकी ३७ सामने जिंकले आहेत. तर १७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.