Ind vs Eng 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद २३ धावा केल्या. आता सामन्यात दोन दिवसांचा खेळ शिल्लक असून इंग्लंडला विजयासाठी ४९८ धावांची गरज आहे. जेनिंग्स १३ तर अलिस्टर कुक ९ धावांवर खेळत आहेत. भारताने दुसरा डाव ७ बाद ३५२ धावांवर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडपुढे विजयासाठी ५२१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.
दुसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आज खेळताना चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी डाव सावरला. दुसऱ्या सत्रात पुजारा ७२ धावांवर बाद झाला. कोहलीने मात्र शतक ठोकले. हे त्याचे कसोटीतील २०वे, तर कारकिर्दीतील २३ वे शतक ठरले. कोहलीने १०३ धावा केल्या. डावाच्या शेवटच्या एका तासात हार्दिक पांड्याने तडाखेबाज अर्धशतक (५२) ठोकले. त्यामुळे भारताला भक्कम आघाडी मिळाली. रशीदने ३, स्टोक्सने २ तर वोक्स आणि अँडरसनने १-१ बळी टिपला.
त्याआधी दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव केवळ १६१ धावांत आटोपला. हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांचे धाबे दणाणले. पाच फलंदाजांना त्याने तंबूत धाडले. जोस बटलरने काही काळ झुंज दिली. पण फटके मारण्याच्या नादात तो देखील सर्वाधिक ३९ धावा करून बाद झाला. हार्दिकने केवळ २८ धावांत ५ बळी टिपले. तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराने यांनी प्रत्येकी २ आणि मोहम्मद शमीने १ बळी टिपला. आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या ऋषभ पंतने पाच झेल टिपले.
तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव ३२९ धावांत संपला. भारताकडून विराट-अजिंक्य वगळता भारताचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. विराटने ९७ तर अजिंक्यने ८१ धावा काढत भारताला मजबूत स्थितीत आणले होते. पण पुढील फलंदाजांनी मात्र निराशा केली. पहिल्या डावात इंग्लंडकडून ख्रिस वोक्स, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी ३-३ बळी टिपले, तर आदिल रशीदने १ गडी बाद केला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद २३ धावा केल्या. आता सामन्यात दोन दिवसांचा खेळ शिल्लक असून इंग्लंडला विजयासाठी ४९८ धावांची गरज आहे.
भारतीय संघाने दुसरा डाव ७ बाद ३५२ धावांवर घोषित केला. या डावात विराट कोहलीने शतक ठोकले. तर चेतेश्वर पुजारा आणि हार्दीक पंड्याने अर्धशतकी खेळी केली. आता इंग्लंडला विजयासाठी ५२१ धावांचे आव्हान देण्यात आले आहे.
भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाला. आदिल रशिदच्या फिरकीवर तो त्रिफळाचित झाला.
भारतीय कर्णधार विराट कोहली शतक ठोकून तंबूत परतला. पाठोपाठ ऋषभ पंत देखील बाद झाला. पंतला या डावात केवळ १ धाव करता आली. अँडरसनने त्याला बाद केले.
भारतीय कर्णधार विराट कोहली याने दमदार शतक ठोकले. पण लगेचच कोहली पायचीत झाला. पहिल्या डावात त्याचे शतक ३ धावांनी हुकले होते. पण दुसऱ्या डावात त्याने शतकाला गवसणी घातली.
भारतीय कर्णधार विराट कोहली याने दमदार शतक ठोकले. पहिल्या डावात त्याचे शतक ३ धावांनी हुकले होते. पण दुसऱ्या डावात त्याने शतकाला गवसणी घातली. त्याने कसोटीतील २०वे, कारकिर्दीतील २३ वे तर कर्णधार म्हणून १६वे शतक ठोकले.
कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांची जमलेली जोडी फोडण्यात बेन स्टोक्सला यश आले. पुजारा ७२ धावांवर झेलबाद झाला.
भारताकडून चेतेश्नवर पुजारा आणि कर्णधार कोहली यांनी अर्धशतक साजरे केले. त्यामुळे उपहारापर्यंत भारत २ बाद १९४ अशा मजबूत स्थितीत असून भारताकडे ३६२ धावांची मोठी आघाडी आहे.
भारताचा चेतेश्नवर पुजारा याने आपले अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ कर्णधार कोहलीनेही अर्धशतक साजरे केले. त्यामुळे आता सामन्यावर भारताची मजबूत पकड असून भारताकडे ३५० धावांची भक्कम आघाडी आहे.