Anderson -Tendulkar Trophy Launch Postponed: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून हेडिंग्लेच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. १२ जूनला अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली होती. एअर इंडियाचं विमान कोसळल्याने २५६ पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर बरेच लोकं दुखापतग्रस्त झाले आहेत. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी १६९ भारतीय आणि ५३ ब्रिटीश प्रवासी विमानात प्रवास करत होते.

बीसीसीआय आणि ईसीबीचा मोठा निर्णय

गेल्या कित्येक वर्षांपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारी कसोटी मालिका पटोदी ट्रॉफी नावाने खेळवली जात होती. मात्र, यावेळी या ट्रॉफीचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मालिका अँडरसन – तेंडुलकर ट्रॉफी नावाने खेळवली जाणार आहे. बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डने मिळून या ट्रॉफिचं अनावरण करण्याची तयारी केली होती. हा अनावरण सोहळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान पार पडणार होता. मात्र, अहमदाबादमध्ये घडलेल्या घटनेनंतर हा सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील मृतांना आदर आणि शोक व्यक्त करण्यासाठी दोन्ही बोर्डांनी हा निर्णय घेतला आहे. हा कार्यक्रम तुर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार होते. मात्र, हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी दोन्ही देशातील दिग्गज खेळाडू जेम्स अँडरसन आणि सचिन तेंडुलकर यांना आमंत्रण दिलं गेलं होतं. दोन्ही दिग्गज खेळाडूंसाठी हा अभिमानाचा क्षण होता.

असं आहे इंग्लंड दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक

पहिली कसोटी: २० ते २४ जून – हेडिंग्ले, लीड्स

दुसरी कसोटी: २ ते ६ जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

तिसरी कसोटी: १० ते १४ जुलै – लॉर्ड्स, लंडन

चौथी कसोटी: २३ ते २७ जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट – द ओव्हल, लंडन