आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार वसीम अक्रम एका चुकीमुळे चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं. रविवारी दुबईत पार पडलेल्या या सामन्यात प्रसारकांनी केलेली चूक वसीम अक्रम यांच्या नाराजीचं कारण ठरली. टॉस झाल्यानंतर दाखवण्यात आलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पाकिस्तानचा गोलंदाज शाहनवाज दहानी याचा समावेश करण्यात आला नसल्याने वसीम अक्रम यांना आश्चर्य वाटलं. आपण पाकिस्तान संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद युसूफ यांच्याशी बोललो असून, दहानी खेळणार असल्याची माहिती त्यांनी दिल्याचं वसीम अक्रम यांनी सांगितलं.

IND vs PAK Asia Cup 2022 : भारताने पाकिस्तानला नमवलं! ५ गडी राखून दणदणीत विजय

विश्लेषण : भारताचा पाकिस्तानवर विजय : सामन्याला कलाटणी देणारे पाच क्षण कोणते?

आपली ही चूक नंतर प्रसारकांकडून सुधारण्यात आली आणि या यादीमध्ये दहानीच्या नावाचा समावेश कऱण्यात आला. पण यानंतरही वसीम अक्रम आपला संताप रोखू शकले नाहीत. इतका मोठा सामना असतानाही अशी चूक कशी काय होऊ शकते? असं त्यांचं म्हणणं होतं.

भारताची विजयी सुरुवात

दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर पाकिस्तानचा डाव १९.५ षटकांत १४७ धावांत आटोपला. पाकिस्तानने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठले. नसीम शाहने डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर भारताचा सलामीवीर केएल राहुलचा त्रिफळा उडवला. यानंतर विराट कोहली (३४ चेंडूंत ३५) आणि कर्णधार रोहित शर्मा (१८ चेंडूंत १२) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ४९ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजने कोहली आणि रोहित या दोघांनाही इफ्तिकार अहमदकरवी झेलबाद केले. सूर्यकुमार यादवही (१८) फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. परंतु जडेजा (२९ चेंडूंत ३५ धावा) आणि हार्दिक (१७ चेंडूंत नाबाद ३३) यांनी ५२ धावांची भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशिक्षक द्रविड करोनामुक्त

भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड करोनामुक्त झाला असून तो संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला आहे. त्याने रविवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषकातील सामन्यात मैदानावर उपस्थित राहून भारतीय खेळाडूंना मार्गदर्शनही केले. द्रविडच्या जागी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची हंगामी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, द्रविड आता करोनातून सावरल्यामुळे लक्ष्मणला पुन्हा मायदेशी पाठवण्यात आले आहे.