India vs South Africa 1st T20 Highlights, 10 December 2023 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज डर्बनमधील किंग्समीड येथे खेळवला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना सुरू होऊ शकला नाही. सततच्या पावसामुळे या सामन्याचा नाणेफेकही होऊ शकली नाही. अशा परिस्थितीत हवामान आणि मैदानाची स्थिती लक्षात घेऊन पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Live Updates

IND vs SA 1st T20 Highlights : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज डर्बनमधील किंग्समीड येथे खेळवला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना सुरू होऊ शकला नाही.

21:34 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज ( १० डिसेंबर ) डर्बनच्या किंग्समीड स्टेडियमवर खेळवला जात होता. पण, संततधार पावसामुळे सामना रद्द करण्यात आला आहे.

https://twitter.com/BCCI/status/1733877679282115004

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना रद्द करण्यात आला आहे. डर्बनमधील किंग्समीड येथे खेळला गेला, तो नाणेफेक न होता रद्द करण्यात आला. वास्तविक, सामन्याशी संबंधित पंच आणि अधिकारी बराच वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, मात्र सुमारे अडीच तास प्रतीक्षा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार होता. सामन्याचा नाणेफेक सात वाजता होणार होता.

20:49 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : डर्बनमधील परिस्थिती निराशाजनक

दुर्दैवाने डर्बनमध्ये अजूनही पाऊस पडत आहे. गोष्टी अस्पष्ट दिसत आहेत, पण चाहत्यांना या सामन्याची आशा आहे. षटके सतत कपात केली जात आहेत. आता पंच काय निर्णय घेतात हे पाहायचे आहे.

20:24 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : पहिला टी-२० सामना पावसामुळे होऊ शकतो रद्द

पहिल्या सामन्यावर पावसाचा परिणाम होऊ शकतो

सततच्या पावसामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्याची नाणेफेक होऊ शकली नाही. अजूनही पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत पावसाचा जोर कायम राहिल्यास हा सामना रद्द होऊ शकतो.

19:53 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : षटकांची कपात कधी सुरु होणार?

जर पहिला टी-२० सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.१० वाजेपर्यंत सुरू झाला नाही, तर एकूण षटकांमध्ये कपात सुरू होईल. याआधी खेळ सुरू झाल्यास २० षटकांचा सामना होईल.

19:32 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : पूर्ण २० षटकांचा सामना होणार का?

पावसाचा व्यत्यय आल्याने नाणेफेकील विलंब झाला आहे. अशा परिस्थितीत पूर्ण २० षटकांचा खेळ शक्य होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे काही वेळानंतर स्पष्ट होईल. सामन्यातील पहिला चेंडू साडेसात वाजता टाकायचा होता, पण नाणेफेक अजून झालेली नाही.

19:08 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीला विलंब

डर्बन मध्ये पाऊस

डर्बनमध्ये सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. किंग्समीड स्टेडियमची खेळपट्टी कव्हरने झाकण्यात आली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1733841598834749905

18:56 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : दीपक चहर पहिल्या टी-२० मध्ये खेळणार नाही

वृत्तानुसार, गोलंदाजी अष्टपैलू दीपक चहर पहिल्या टी-२० मध्ये खेळणार नाही. अशा परिस्थितीत मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार हे त्रिकूट आज वेगवन गोलंदाजीची कमान सांभाळताना दिसू शकते. चहर वडिलांच्या आजारपणामुळे संघात सहभागी झालेला नाही.

18:55 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : दीपक चहर पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही

दीपक चहर पहिल्या टी-२० मध्ये खेळणार नाही

वृत्तानुसार, गोलंदाजी अष्टपैलू दीपक चहर पहिल्या टी-२० मध्ये खेळणार नाही. अशा परिस्थितीत मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार हे त्रिकूट आज वेगवन गोलंदाजीची कमान सांभाळताना दिसू शकते. चहर वडिलांच्या आजारपणामुळे संघात सहभागी झालेला नाही.

18:34 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : कुलदीप यादव की रवी बिश्नोई, कोणाला मिळणार संधी?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत कुलदीप यादवची निवड झाली आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये रवी बिश्नोईपेक्षा अधिक प्राधान्य दिले जाणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत बिश्नोईने शानदार गोलंदाजी केली. तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. सध्या तो टी-२० मध्ये जगातील नंबर १ गोलंदाज आहे.

18:11 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : रवींद्र जडेजाच्या कामगिरीवर सर्वांची नजर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. कारण विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत जडेजाला विश्रांती देण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याला अक्षर पटेलच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/BCCI/status/1733828355084910757

17:50 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : टी-२० मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दोन्ही संघातील आकडेवारी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात किती टी-२० सामने खेळले गेले: २३

टी-२० मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला किती सामन्यात पराभूत केले: १३

टी-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला किती सामन्यात पराभूत केले: १०

भारताने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीवर किती वेळा पराभूत केले: ५

https://twitter.com/BCCI/status/1733531955709489309

17:37 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : शुबमन गिलला संधी मिळेल का?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शुबमन गिलची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टी-२० मध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल का? रुतुराज गायकवाड यांच्या जागी गिल यांची निवड होऊ शकते. ऋतुराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शतक झळकावले होते.

17:25 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : किंग्समीड स्टेडियमवर भारताचा यापूर्वीचा विक्रम

भारताने या मैदानावर आतापर्यंत एकूण पाच टी-२० सामने खेळले आहेत, २००७ मध्ये भारताने आपले सर्व सामने येथे खेळले होते. भारताने येथे ५ पैकी ३ सामने प्रथम फलंदाजी करत जिंकले आहेत. येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना झाला, जो भारताने ३७ धावांनी जिंकला होता.

17:07 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : डर्बनमधील किंग्समीडची खेळपट्टी कशी आहे?

डर्बनमधील किंग्समीड क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे. येथे वेगवान गोलंदाजांना चांगली उसळी मिळते. ही जगातील सर्वात वेगवान खेळपट्ट्यांपैकी एक आहे. वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीवर खूप मदत मिळते. मात्र, येथे खूप धावा देखील होतात. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे फायदा होऊ शकतो. येथे पाठलाग करणाऱ्या संघाची सरासरी १४३ धावा आहे. अलीकडे, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ तीन टी-२० सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले होते, जिथे तिन्ही वेळा १९० पेक्षा जास्त धावसंख्या झाली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १८० धावा केल्या तर विजयाची शक्यता जास्त असते. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी १५३ धावांची आहे.

16:52 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हवामान अहवाल

हवामान वेबसाइट Accuweather नुसार, डरबनमध्ये सामन्याच्या दिवशी म्हणजेच १० डिसेंबरला पावसाची ६० टक्के शक्यता आहे. म्हणजे पावसामुळे खेळात व्यत्यय येऊ शकतो. दिवसभरात कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस राहील, तर संध्याकाळी तापमान २० अंशांच्या खाली जाण्याची शक्यता आहे.

16:34 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ

यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुनील, रवींद्र जडेजा. कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

16:26 (IST) 10 Dec 2023
IND vs SA 1st T20 : टी-२० फॉरमॅटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे आकडेवारी

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आतापर्यंत एकूण २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. टीम इंडियाने प्रोटीज संघाविरुद्ध १३ सामन्यांत बाजी मारली आहे, तर प्रोटीज संघाने १० सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला.

https://twitter.com/BCCI/status/1733705601547370652

India vs South Africa 1stT20 Live Updates in Marathi

IND vs SA 1st T20 Highlights : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात डर्बनमधील किंग्समीड येथे खेळवण्यात येणारा पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला. सततच्या पावसामुळे सामन्याची नाणेफेकही होऊ शकली नाही.

Story img Loader