scorecardresearch

IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना आज रंगणार; कुठे व कधी पाहाल लाईव्ह?

IND vs SA First Match Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन टी २० सामन्यांच्या मालिकेला आज म्हणजेच २८ सप्टेंबरला सुरुवात होणार आहे.

IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना आज रंगणार; कुठे व कधी पाहाल लाईव्ह?
India vs South Africa 1st T20 Live Streaming

IND vs SA First Match Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन टी २० सामन्यांच्या मालिकेला आज म्हणजेच २८ सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. तिरुवनंतपूरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर हे दोन संघ आमनेसामने येतील.टी २० विश्वचषकाच्या तयारीसाठी संघाला दोन टी २० मालिका खेळायच्या होत्या. यात सुरुवातील ऑस्ट्रेलिया विरुद्ध २-१ असा विजय प्राप्त करून टीम इंडियाने दणक्यात सुरुवात केली आहे तर आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका जिंकल्यावर आता भारतासाठी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणे महत्त्वाचे ठरणार आहे. बीसीसीआयने २३ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकाला समोर ठेवून हा दौरा आखला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतासाठी कट्टर स्पर्धक ठरू शकतो. गेल्या काही महिन्यात एकदाही न हरलेल्या आफ्रिकेसमोर खेळताना भारताला पूर्ण शक्ती एकवटून खेळावे लागणार आहे. या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू हार्दिक पंडय़ा यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच मोहम्मद शमीसुद्धा संघात नसेल, यापूर्वीच दुखापतीमुळे रविंद्र जडेजा सुद्धा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामन्याचे तपशील जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कुठे रंगणार?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी २० सामना हा केरळ मधील तिरुवनंतपूरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ

सायंकाळी ७ वाजता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याची सुरुवात होईल. याआधी ६,३० वाजता नाणेफेक होणार आहे.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिका संघ

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (क), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, तबरेझ शम्सी, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा आणि लुइन रोख.

आजचा सामना कुठे पाहाल लाईव्ह?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. आजचा सामना स्टार स्पोर्ट्सच्या स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी वन आणि स्टार स्पोर्ट्स वन हिंदीवर पाहता येईल.

ऑनलाइन कुठे पाहता येणार सामना?

डिस्ने-हॉटस्टारच्या माध्यमातूनही या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. मोबाईल, लॅपटॉप स्मार्ट टीव्हीवर डिस्ने-हॉटस्टार अ‍ॅपच्या माध्यमातून हा सामना पाहता येईल.

दरम्यान, यापूर्वी भारतीय संघ २०१९ मध्ये वेस्ट इंडिजच्या विरुद्ध याच मैदानात आमनेसामने आला होता, विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला या सामन्यात विंडीजने एकतर्फी खेळ दाखवत पराभूत केले होते. या मैदानावर भारतीय संघ यापूर्वी दोन टी20 सामने खेळला आहे. भारताने एका सामन्यात विजय मिळवला आहे, तर दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या