जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आयपीएलच्या (IPL 2022) पुढील हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ जोडले जाणार आहेत. यापैकी लखनऊ फ्रेंचायझीचे नाव लखनऊ सुपर जायंट्स असे आहे. लखनऊ संघाने आज सोमवारी आपला लोगो सर्वांसमोर आणला. या संघाची मालकी आरपी संजीव गोयंका यांच्याकडे आहे. लखनऊ संघाच्या लोगोमध्ये एक बॅट दिसत आहे, ज्यावर तिरंग्याचे पंख लावण्यात आले आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स संघाने एक व्हिडिओ शेअर करत लोगो सर्वांसमोर आणला. लोगोमध्ये मध्यभागी एक चेंडू आणि बॅट आहे. फ्रेंचायझीचे पूर्ण नाव तळाशी लिहिलेले आहे, जे निळ्या रंगात आहे. लखनऊ फ्रेंचायझीचा लोगो प्राचीन भारतातील पौराणिक कथांपासून प्रेरित असल्याचे एका संदेशात सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – “मला धक्काच बसला…”, विराटनं CAPTAINCY सोडल्यानंतर रिकी पाँटिंगला काय वाटलं एकदा वाचाच!
गरुडाने आम्हाला संघाचे पंख असलेले प्रतीक बनवण्याची प्रेरणा दिली आहे. प्रत्येक भारतीय संस्कृतीत गरूड सर्वव्यापी आहे, असे फ्रेंचायझीने सागितले. केएल राहुल लखनऊ फ्रेंचायझीचा कर्णधार असेल. १७ कोटी रुपयांच्या मोबदल्यात राहुलला संघात सामील केले गेले आहे. राहुल हा आयपीएलचा आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.