श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका संपल्यावर न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांत वनडे आणि टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे यापैकी टी-२० संघातून विराट कोहली आणि रोहित शर्माचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिका पांड्या करताना दिसेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेल्या संघात या दोघांच्या अनुपस्थितीमुळे, बीसीसीआय दूर दृष्टी ठेवून नवी योजना आखत असल्याचे संकेत मिळतात. कारण हे दोन्ही खेळाडू निवडीसाठी उपलब्ध होते. त्यामुळे आता बीसीसीआयने विराट-रोहितला टी-२० संघातून कायमचे काढून टाकले आहे, असे देखील अंदाज बांधले जात आहेत. टी-२० मालिकेला २७ जानेवारीपासून सुरुवात होणार आहेत. या मालिकेत तीन सामन्यांचा समावेश आहे.

रोहित-विराट आता वनडे-कसोटी खेळणार आहेत –

रोहित-विराट यांची न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवड न झाली नाही. त्यामुळे बीसीसीआय आता या दोन खेळाडूंकडे केवळ एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांच्या दृष्टीने पाहत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या वर्षी एकदिवसीय विश्वचषकही होणार आहे. अशा परिस्थितीत रोहित-विराटने केवळ एकदिवसीय फॉर्मेटवर लक्ष केंद्रित करावे, तसेच हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी नवीन टीम इंडिया तयार करावी, असा बीसीसीआयचा विचार असल्याचा अंदाज येत आहे.

हेही वाचा –

टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध ३ वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्याने टी-२० मधील आपल्या भवितव्याबद्दल स्पष्टपणे सांगितले होते, की सध्या तो टी-२० खेळत राहील आणि निवृत्ती घेण्याचा त्याचा कोणताही विचार नाही. त्यानंतर आता टी-२० संघातून वगळल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

रोहित-विराटच्या टी-२० संघातून कायमची रजा?

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितले की, ”भारतीय टी-२० संघातून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची रवानगी कायम आहे. भविष्यात काहीही होऊ शकते. पण सध्यातरी आपल्याला पुढे जाण्याची आणि २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी नवीन योजना आखण्याची गरज आहे. दुर्दैवाने, ते आमच्या भविष्यातील टी-२० योजनेत बसत नाहीत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र सिंग चहल, अर्शदीप सिंग उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ आणि मुकेश कुमार.