भारतीय फुटबॉलला नवी झळाळी देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या चषकाचे अनावरण रविवारी आयएमजी-रिलायन्सच्या अध्यक्षा नीता अंबानी यांच्या हस्ते करणअयात आले.
२६ इंच उंच असलेला हा चषक फ्रेझर आणि हॉस यांनी बनवला आहे. या वेळी आठ संघांचे आयकॉन खेळाडू उपस्थित होते. फ्रेड्रिक लुजेनबर्ग (मुंबई), अलेसांड्रो डेल पिएरो (दिल्ली), जुआन कॅपडेव्हिया (नॉर्थईस्ट), डेव्हिड ट्रेझेग्युएट (पुणे), रॉबर्ट पायरेस (गोवा), मायकेल सिल्व्हेस्टर (चेन्नई), लुइस गार्सिया (कोलकाता) आणि डेव्हिड जेम्स (केरळ) या खेळाडूंनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
या वेळी नीता अंबानी म्हणाल्या की, ‘‘जगातील महान फुटबॉलपटूंसोबत आयएसएलच्या चषकाचे अनावरण करताना मला आनंद होत आहे. हे आयकॉन खेळाडू देशातील युवा खेळाडूंसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. देशातील युवा खेळाडूंसाठी हा चषक प्रेरणादायी ठरेल, अशी आशा आहे.