चॅम्पियन्स चॅलेंज-१ हॉकी स्पर्धेत भारतीय महिलांच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. गुरुवारी झालेल्या लढतीत बेल्जियमने भारताचा ५-० असा धुव्वा उडवला. गटातील शेवटच्या साखळी लढतीत भारतासमोर तुलनेने युवा बेल्जियमच्या संघाचे आव्हान होते. आधीच्या सामन्यातील दारुण पराभव बाजूला सारत तीन गुण पटकावण्याची भारताला संधी होती, मात्र बेल्जियमच्या ऊर्जेपुढे भारतीय संघ निष्प्रभ ठरला. प्रशिक्षक नील हॉगुड यांच्या सूचनेनुसार भारतीय संघाने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपुराच ठरला.
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2014 रोजी प्रकाशित
भारतीय महिलांचा पराभव
चॅम्पियन्स चॅलेंज-१ हॉकी स्पर्धेत भारतीय महिलांच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. गुरुवारी झालेल्या लढतीत बेल्जियमने भारताचा ५-० असा धुव्वा उडवला. गटातील शेवटच्या साखळी लढतीत भारतासमोर तुलनेने युवा बेल्जियमच्या संघाचे आव्हान होते.
First published on: 02-05-2014 at 12:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian women lose 0 5 against belgium in champions challenge