भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले. कुस्तीपटूंना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप पुनियाने केला. या प्रकरणी बजरंग पुनिया आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन पुकारलं आहे.

बजरंग पुनिया, विनेश फोगट, रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती सरिता मोर, संगीता फोगट, सत्यवर्त मलिक, जितेंदर किन्हा आणि CWG पदक विजेता सुमित मलिक यांच्यासह ३० कुस्तीपटू जंतरमंतर येथे जमले आहेत.

हेही वाचा- विश्लेषण: जंतरमंतर का बनले कुस्तीगिरांचा आखाडा? कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर आरोप नेमके काय?

“रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडून (WFI) कुस्तीपटूंचा छळ केला जात आहे. WFI च्या मंडळाचा भाग असणाऱ्या लोकांना या खेळाबद्दल काहीही माहिती नाही,” असा आरोप बजरंग पुनियाने पत्रकार परिषदेत केला.

हेही वाचा- IND vs NZ 1st ODI: विराट-शिखरला मागे टाकत शुबमन बनला नंबर वन फलंदाज; थोडक्यात हुकला ‘हा’ विश्वविक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमची लढाई सरकार किंवा स्पोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाविरोधात (SAI) नाही. आमची लढाई WFI विरुद्ध आहे. याबाबतचा तपशील आम्ही नंतर शेअर करू. ‘यह अब आर पार की लढाई है’,” असंही पुनियाने म्हटलं.