Rohit Sharma Samosa Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन गड्यांच्या मोबदल्यात २८९ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या १९१ धावांनी मागे आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या सामन्याची लढाई सुरूच आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांवर जोरदार टीका झाली. कांगारूंनी एकाही भारतीय गोलंदाजाला सोडले नाही ज्याच्यावर आपल्या फलंदाजीने आक्रमण चढवले नाही. अशात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा वेगळ्या अंदाजात दिसत आहे. बाद झाल्यानंतर रोहितला इतकी भूक लागली की तो सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये समोसा खाण्यासाठी पोहोचला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय चाहते सोशल मीडियावर हिटमॅनला ट्रोल करत आहेत. शेवटी काय आहे या व्हिडिओचे संपूर्ण सत्य, जाणून घेऊया या.

LSG fan video viral at Chepauk Stadium
CSK vs LSG : चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर लखनऊच्या ‘त्या’ चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या डावात चमकदार कामगिरी करताना दिसत होता. पण, त्याच्या एका शॉटने प्रत्येक चाहत्याचे मन हेलावले. हिटमॅन ३५ धावा करून तंबूत परतला. यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित प्रेक्षकांमध्ये समोसे खाण्यासाठी पोहोचला. मात्र, व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती रोहित नसून त्याचा चाहता आहे. जो रोहित शर्माच्या नावाचा टी-शर्ट घालून सामना पाहण्यासाठी आला होता आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत समोसे खाताना कॅमेऱ्यात कैद झाला. या चाहत्याचा चेहरा दिसत नसला तरी सोशल मीडियावर हिटमॅनला नक्कीच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा: IND vs AUS: “आम्ही जातो आमुच्या गावा…”, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमनचे शतक अन् सोशल मीडियावर केएल राहुल झाला जबरदस्त ट्रोल

अहमदाबादमध्ये तिसऱ्या दिवसाचा खेळ संपताना भारताने तीन गडी गमावत२८९ धावा केल्या आहेत. विराट कोहली ५९ आणि रवींद्र जडेजा १६ धावांवर खेळत आहे. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा १९१ धावांनी मागे आहे. जडेजा आणि कोहली यांच्यात ४४ धावांची भागीदारी झाली आहे. या दोघांनाही सामन्याच्या चौथ्या दिवशी मोठी भागीदारी करून टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणायचे आहे. पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारून शेवटच्या ऑस्ट्रेलियन संघाला सामन्यातून बाहेर काढण्याचा भारताचा प्रयत्न असेल.