भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पार पडला. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर असे काहीतरी घडले ज्याने एक खास विक्रम केला आहे. भारतीय महिला संघाने या वर्षभर अजिंक्य राहिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाची चव चाखवली.

४७००० हजार चाहत्यांचे उपस्थिती –

या सामन्यातील भारताचा विजय साधा नव्हता, पण १८७ धावा केल्यानंतर टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये कांगारू संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. रोमांचने भरलेल्या या सामन्यात सर्वाधिक योगदान इथे पोहोचलेल्या ४७००० चाहत्यांचे होते. कोरोना महामारीनंतर प्रथम महिला क्रिकेट सामन्याला इतक्या प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली. तसेच प्रेक्षकांनी टीम इंडियामध्ये उत्साह भरला. ज्यामुळे जे करणे कठीण वाटत होते, ते सहज साध्य झाले.

बेथ मुनी आणि ताहिला मॅकग्राच्या झंझावाती खेळीच्या जोरावर, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १ विकेटच्या मोबदल्यात १८७ धावा केल्या. मुनीने ५४ चेंडूत ८२ तर मॅकग्राने ५१ चेंडूत ७० धावांची नाबाद खेळी केली. ही धावसंख्या भारतीय फलंदाज मैदानात येईपर्यंत मोठी दिसत होती. त्यानंतर शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी धडाकेबाज सुरुवात केली. दोघींनी 8 षटकात ७४ धावा कुठल्या. शेफाली ३४ धावा करून बाद झाल्यावर जेमिमा रॉड्रिग्जदेखील लगेच बाद झाली.

कर्णधार हरमनप्रीत कौरसह मंधानाने शानदार फटकेबाजी सुरूच ठेवली. २१ धावा करून कर्णधार बाद झाली, पण मंधानाच्या ४९ चेंडूत ७९ धावांच्या खेळीने सामना बरोबरीत आणला. अखेर रिचा घोषने तुफानी फटके मारून सामना बरोबरीत आणला. जेव्हा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला तेव्हा मंधानाच्या बॅटने पुन्हा धमाका केला. ज्यामुळे अखेरीस भारताने सामना जिंकून मालिकेत १-१ ने बरोबरी केली.

सुपर ओव्हरमध्ये विजय –

हेही वाचा – सुपर ओव्हरमध्ये भारताचा रोमहर्षक विजय; ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय महिलांनी सुपर ओव्हरमध्ये २० धावा केल्या. सहा चेंडूंमध्ये या धावसंख्येचा पाठलाग करुन २१ धावा करणं ऑस्ट्रेलियन संघाला जमलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघाला १६ धावांपर्यंत मजल मारता आली आणि भारताने हा सामना जिंकला. वेगवान गोलंदाज रेणूका सिंहने सुपर ओव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी केली. २० धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाला गाठता येणार नाही अशी टिचून गोलंदाजी रेणूकाने केली.