INDW vs AUSW India beat Australia in run-chase check List of records broken : भारताच्या महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियाच्या संघाला हरवण्यासाठी ३३९ धावांचे मोठे लक्ष्य यशस्वीरित्या गाठत भारतीय संघान गुरुवारी नवी मुंबईत एक अविस्मरणीय वियय नोंदवला. याबरोबरच भारतीय संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताने तिसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. जेमिमाह रॉड्रिग्सने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर केले. याबरोबरच कालच्या सामन्यात भारतीय संघाने अनेक रेकॉर्ड्स देखील मोडले आहेत. चला जाणून घेऊया…
महिला क्रिकेटमधील विक्रमी ‘रन चेस’
१) भारतीय क्रिकेट संघाने काल ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत ३३९ धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण करत ४८.३ षटकांत ५ गडी राखून विजय मिळवला. हा महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील आणि कोणत्याही महिला विश्वचषकातील आजवरचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला आहे.
२) इतेकच नाही तर हा आजवरच्या कोणत्याही विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यात यशस्वीरित्या करण्यात आलेला हा सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग होता, ज्यामुळे भारताने आजवर केलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत मिळवलेल्या विजयांच्या यादीत हा विजय पहिल्या स्थानावर आहे. याआधी हा पराक्रम कोणत्याही संघाला करता आलेला नाही. विशेष बाब म्हणजे, पुरुष आणि महिला दोन्ही वनडे विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यांमध्ये आजवर ३०० हून अधिक धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ होती.
महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासातील यशस्वीरित्या गाठण्यात आलेल्या ३०० हून अधिक धावांच्या लक्ष्य
- ३३९ – भारत (महिला) विरूद्ध ऑस्ट्रेलिया (महिला) , मुंबई डीवायपी, २०२५ वर्ल्डकप
- ३३१ – ऑस्ट्रेलिया (महिला) विरुद्ध भारत (महिला), विशाखापट्टनम, २०२५ वर्ल्डकप
- ३०२ – श्रीलंका (महिला) विरूद्ध दक्षिण आफ्रिका, Potchefstroom, २०२४
जेमिमा रॉड्रिग्सने एक महत्त्वपूर्ण अशी नाबाद १२७ धावांची खेळी केली ज्यामुळे भारताला ही कामगिरी करणे शक्य झाले. हा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कोणत्याही भारतीय खेळाडूने केलेला सर्वाधिक स्कोअर आहे.
३) तसेच सेमी-फायनलमध्ये शतक ठोकल्याने जेमिमा ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध नॉकआउट सामन्यात शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तसेच विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना शतक झळकावणारी ती दुसरी फलंदाज ठरली आहे. यापूर्वी Nat-Sciver Bruntने २०२२ च्या अंतिम सामन्यात नाबाद १४८ धावांची खेळी केली होती.
जेमिमा आणि हरमनप्रीत यांची विक्रमी भागिदारी
४) या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर यांच्यात झालेली १६७ धावांची भागीदारी ही आतापर्यंतच्या महिला विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यांमध्ये कोणत्याही भारतीय जोडीने केलेली सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.
तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने रचलेला ३३८ धावांचा डोंगर हा ऑस्ट्रेलियाचा महिला विश्वचषक उपांत्य फेरीतील सर्वात मोठा स्कोअर बनला आहे. ज्यामध्ये Phoebe Litchfield चे ११९ धावांचे तर Ellyse Perry चे ७७ धावांचे योगदान होते. तसेच या सामन्यात दोन्ही संघानी ६७९ धावा काढल्या हा महिला वनडे विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक एकूण धावसंख्येचा (total aggregate) विक्रम आहे.
कमी वयात मोठं यश
ऑस्ट्रेलियन सलामीवीर Phoebe Litchfield ने विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यात शतक झळकावणारी सर्वात कमी वयाची खेळाडू म्हणून विक्रम नोंदवला आहे, तिचे वय २२ वर्षे आणि १९५ दिवस इतके आहे. तिने दक्षिण आफ्रिकेच्या Laura Wolvaardt ला फक्त एका दिवसाने मागे टाकले आहे. तसेच Litchfieldने केलेली ११९ ही धावसंख्या नॉकआउट सामन्यात केलेली सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.
विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका
भारतीय महिला क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रविवारी (२ नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. हा सामना नवी मुंबई येथील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे होणार आहे.
