महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धेला शुक्रवारपासून (दि. १० फेब्रुवारी) केप टाऊन येथे सुरुवात  झाली. स्पर्धेतील तिसरा सामना भारतीय महिला विरुद्ध पाकिस्तान महिला संघात पार पडणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी हा सामना खेळला जाईल. दोन्ही संघ या सामन्यातून आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करतील. स्पर्धेतील पुढील वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा सामना जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. मात्र, या सामन्यात हरमनप्रीत कौर कोणता भारतीय संघ उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच संदर्भात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ट्विटर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

विराट कोहलीने शेअर केला व्हिडिओ

महिला टी२० विश्वचषकाला १० तारखेपासून सुरुवात झाली असली तरी त्याआधीपासूनचं स्टार स्पोर्ट्सने महिला संघाला प्रेरणा देणारा व्हिडिओ तयार केला होता. तो व्हिडिओ भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने ट्विटर शेअर करत हरमनप्रीतच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्या व्हिडिओ मध्ये असे म्हटले आहे की, “ही हिस्ट्री नाही हिज काढून हर स्टोरी आहे म्हणजेच हा इतिहास नाही त्याची नाही तर तिची कहाणी आहे.” त्यात शर्मा नावाची जर्सी असलेला टी-शर्ट ती एक महिला घ्यायला जाते पण तिला रोहित शर्माची जर्सी तो दुकानदार देतो. मात्र ती म्हणते की, “ही जर्सी नाही तर वेगळी हवी आहे.” त्यावर तो दुकानदार तिला म्हणतो की, “मॅडम तुम्हाला फारसे क्रिकेट माहिती नाही वाटत..” यावर ती महिला म्हणते की, “ तुम्हालाच फारसे क्रिकेट माहिती नाही मी दीप्ती शर्माची जर्सी मागितली तुम्ही मला वेगळ्या शर्माची दिली.” यावर तो दुकानदार तिला जर्सी देतो. ही जाहिरात कोहलीने शेअर केली आहे.

काही दिवसांपूर्वीच भारताच्या अंडर १९ महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करत टी२० विश्वचषक आपल्या नावे केला. अगदी त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न वरिष्ठ महिला संघ देखील करेल. सलग दुसऱ्यांदा हरमनप्रीत कौर टी२० विश्वचषकात संघाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय संघाने २०२० टी२० विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेली. मात्र, अंतिम फेरीत यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलेले.

या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला नियमित उपकर्णधार स्मृती मंधाना हिची उणीव भासेल. बोटाच्या दुखापतीमुळे ती पहिल्या सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळे सलामीवीर शफाली वर्मा, कर्णधार हरमनप्रीत कौर व रिचा घोष यांच्यावर फलंदाजी विभागाची अतिरिक्त जबाबदारी असेल. अष्टपैलू दिप्ती शर्मा व राधा यादव फिरकीची जबाबदारी सांभाळतील. वेगवान गोलंदाजीचा भार अनुभवी शिखा पांडे व युवा रेणुका ठाकूर वाहतील. भारतीय संघाला विश्वचषकात दुसऱ्या गटात पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि आयर्लंड या संघांसोबत ठेवले गेले आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुरू होईल.

हेही वाचा: WPL Auction 2023: पहिल्यावहिल्या WPL लिलावासाठी BCCI सज्ज; कोण ठरणार कोट्याधीश तर कोण राहणार अनसोल्ड!

भारतीय महिला संघ: स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग, शिखा पांडे, देविका वैद, हरलीन देओल, अंजली सरवाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तान महिला संघ: मुनीबा अली, सिद्रा अमीन, बिस्मा मारूफ (कर्णधार), ओमामा सोहेल, निदा दार, आलिया रियाझ, सिद्रा नवाज (यष्टीरक्षक), फातिमा सना, नशरा संधू, जवेरिया खान, आयमान अन्वर, सादिया इक्बाल, आयशा नसीम, ​​तुबा हसन, सदफ शमास